Pune Crime: पुण्यात सख्या बहिणीनेच आपल्या लहान बहिणीशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यासाठी पीडित तरुणी पोलीस स्थानकामध्ये पोहोचली असता पोलीसही चक्रावले आहेत. याप्रकरणामध्ये सध्या पोलिसांनी मोठ्या बहिणीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. विमानतळ पोलिस ठाण्यात एका 18 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून 24 वर्षीय मोठ्या बहीणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय तरुणी आणि 24 वर्षीय आरोपी या दोघी सख्या बहीणी आहेत. या दोघीही विमाननगर परिसरातील एका रो-हाऊसमध्ये एकत्र राहतात. धाकटी बहीण 23 जानेवारी रोजी घरातील हॉलमध्ये झोपली असताना मोठ्या बहीणीने तिच्याशी अश्लील चाळे केले. तरुणीला हा प्रकार चुकीचा वाटला. तिने या गोष्टीला विरोध केला. मात्र मोठ्या बहिणीने तिच्यावर जबरदस्ती केल्याने तिने पोलिस ठाण्यात धाव घेत मोठ्या बहिणीविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारदार तरुणी ही सध्या बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. तर संशयित आरोपी असलेल्या मोठ्या बहीणीचे लग्न झाले आहे. आरोपी असलेल्या मोठ्या बहिणीचेही पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले आहे. मोठ्या बहीणीचे लग्न झाले असले तरी ती वडीलांकडेच राहते.
लहान बहीण घराच्या हॉलमध्ये झोपलेली असताना थोरल्या तिच्या शरीरावरून हात फिरवीत तिच्याशी अश्लील कृत्य करायला सुरुवात केली. झोपलेल्या छोट्या बहिणीला आधी आपल्याबरोबर काय होत आहे हे समजत नव्हतं. मात्र डोळे उघडले तेव्हा मोठी बहीण आपल्या शरीराशी चाळे करत असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर दोघींमध्ये चांगलीच वादावादी झाली. तरीही मोठ्या बहिणीने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र लहान बहिणीने वारंवार या कृत्याला विरोध केला. मोठी बहीण या पीडित तरुणीच्या शरीराला हात लावण्याचा, तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न करत होती. या साऱ्या प्रकारामुळे छोटी बहीण चांगलीच घाबरली आणि ताई आपलं ऐकायला तयार नाही हे समजल्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली.
पोलीस स्थानकामध्ये धाव घेण्याआधी छोट्या बहिणीने मोठ्या बहिणीला समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला. या दोघींमधील वाद वाढला आणि लहान बहिणीने थेट पोलिसांत धाव घेतली. पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. हा प्रकार ऐकून पोलिसही चक्रावले त्यांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे. मोठ्या बहिणीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची स्थानिकांमध्ये चांगलीच चर्चा असून अनेकांनी यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे.