व्हॉट्सअ‍ॅपवर डिलीट केलेले मेसेजही परत मिळवू शकता! कसं असेल नवीन फीचर जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅपची लोकप्रियता पाहता मेटाही या अ‍ॅपमध्ये वेळोवेळी अपडेट करत असते. आता हे मेसेजिंग अ‍ॅप वापरणं आणखी मजेशीर होणार आहे. 

Updated: Jun 4, 2022, 05:31 PM IST
व्हॉट्सअ‍ॅपवर डिलीट केलेले मेसेजही परत मिळवू शकता! कसं असेल नवीन फीचर जाणून घ्या title=

मुंबई: जगात सर्वाधिक स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप हे मेसेजिंग अ‍ॅप पाहायला मिळतं. संवाद साधण्यासोबत या अ‍ॅपवर मेसेज फॉरवर्ड केले जातात. या अ‍ॅपची लोकप्रियता पाहता मेटाही या अ‍ॅपमध्ये वेळोवेळी अपडेट करत असते. आता हे मेसेजिंग अ‍ॅप वापरणं आणखी मजेशीर होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर ठराविक कालावधीपर्यंत मेसेज डिलीट करण्याची सुविधा आहे. या फीचरमुळे तुमच्या तसेच समोरच्या व्यक्तीला पाठवलेला  मेसेज डिलीट करू शकता. आता व्हॉट्सअ‍ॅप एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे. यामध्ये तुम्ही डिलीट केलेले मेसेज देखील परत मिळवू शकता.

WABetaInfo च्या ताज्या अहवालानुसार, चॅटिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे. या फीचर अंतर्गत, युजर्स चॅटिंग करताना 'Undo' बटण वापरू शकणार आहेत. हे फीचर अजून रिलीज करण्यात आलेले नाही पण WhatsApp यावर काम करत आहे. या फीचरमुळे तुम्ही डिलीट केलेला मेसेज परत मिळवू शकाल. वास्तविक, अनेक वेळा असे घडते की 'डिलीट फॉर एव्हरीवन' ऐवजी तुम्ही 'डिलीट फॉर मी' असं करता. त्यामुळे समोरच्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवरून मेसेज उडवणं कठीण होतं. हे फीचर अशा वेळेसाठी कामी येणार आहे.

तुम्ही मेसेज 'डिलीट फॉर मी' करताच तुमच्या स्क्रीनवर एक पॉप-अप दिसेल. यामध्ये तुम्हाला डिलीट केलेला मेसेज 'Undo' करण्याचा पर्याय दिला जाईल. हा पर्याय तुम्हाला फक्त काही सेकंद किंवा मिनिटांसाठी दिला जाईल. हे फीचर टेलिग्राम सारख्या इतर चॅटिंग अ‍ॅप्सवर आधीपासूनच उपलब्ध आहे.

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार सध्या नवीन 5 फीचर्स ही बीटा व्हर्जनमध्ये टेस्ट केली जात आहेत. इमोजी रिअ‍ॅक्शन अधिक चांगली करण्यासाठी Whatsapp काम करत आहे. याशिवाय यूजर्सना टेक्स्ट मेसेज एडिट करणे, कव्हर फोटो लावणे आणि स्टेटसवर रिप्लाय इंडिकेटर असे अनेक नवीन पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहेत.