Upcoming Cars : कार खरेदी करायचीय? थोडं थांबा, बाजारात येणार 'ही' जबरदस्त कार

 तुम्ही नवीन कारचा विचार करत असाल तर जानेवारीपर्यंत थांबा. कदाचित तुमच्या ठरलेल्या बजेटमध्ये तुम्हाला आणखी चांगली कारही मिळू शकते.

Updated: Nov 7, 2022, 11:02 AM IST
Upcoming Cars : कार खरेदी करायचीय? थोडं थांबा, बाजारात येणार 'ही' जबरदस्त कार    title=

Auto Expo 2023: गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे (corona) ऑटोमोबाईल मार्केटमध्ये मंदी सदृश्य वातावरण होते. मात्र यात तेजी पाहायला मिळत आहे. अशातच आता देशातील सर्वात मोठा ऑटो शो अर्थात ऑटो एक्स्पो (Auto Expo 2023) जानेवारी 2023 मध्ये सुरू होणार आहे. गेल्या वर्षी मकोविड-19 महामारीमुळे हा शो आयोजित करण्यात आला नव्हता. मात्र आता 13 ते 18 जानेवारी दरम्यान हा शो आयोजित केला जाणार आहे. या शोमध्ये नवीन गाड्या लॉन्च होणार आहेत. 

'या' कार होणार लॉन्च

यामध्ये टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, टोयोटा, होंडा, एमजी, रेनॉल्टसह अनेक कंपन्या आपल्या कार लॉन्च करणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी ऑटो शोमध्ये इलेक्ट्रिक कारचे अनेक मॉडेल्स बघायला मिळू शकतात. या शोमध्ये ओला आपली पहिली इलेक्ट्रिक कार देखील लॉन्च करू शकते. अशात तुम्ही नवीन कारचा विचार करत असाल तर जानेवारीपर्यंत थांबा. कदाचित तुमच्या ठरलेल्या बजेटमध्ये तुम्हाला आणखी चांगली कारही मिळू शकते. 

वाचा :  घरबसल्या जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर, कस ते पाहा  

देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी Maruti Suzuki India Limited (MSIL) हे ऑटो एक्स्पो 2023 मध्ये सहभागी होणार्‍या सर्वात मोठ्या नावांपैकी एक आहे. त्यानंतर दक्षिण कोरियाच्या Hyundai Motor India आणि Kia India या ऑटोमेकरचा क्रमांक लागतो. याशिवाय चीनमधील सर्वात नवीन ऑटोमेकर - BYD (बिल्ड युवर ड्रीम्स) सोबत, आणखी एक चिनी ऑटोमेकर एमजी मोटर इंडिया उपस्थित असेल. टोयोटा किर्लोस्कर मोटर, लेक्सस इंडिया आणि व्होल्वो इंडिया हे देखील 2023 ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी होणार आहेत. ओकिनावा, आणि टॉर्क मोटर्स सारख्या एक टन EV स्टार्टअप्ससह Hero Electric सारख्या मोठ्या EV नावाचे ब्रँड देखील या कार्यक्रमात भाग घेणार आहेत.

Auto Expo 2023: Who’s participating, who is not, & why!

ऑटो एक्सपो 2023 मध्ये मारुती सुझुकी 

मारुती सुझुकीसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ऑटो एक्स्पो एक मोठा इव्हेंट ठरणार आहे. यात कंपनी आपली मोस्ट अवेटेड ऑफरोड एसयूव्ही जिम्नी लॉन्च करू शकते. ही कार देशाच्या विविध भागांमध्ये टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे. ही कार थेट महिंद्रा थार आणि फोर्स गुरखा यांना टक्कर देईल. 

वाचा : T20 World Cup  सेमीफायनलबाबत चिंतेत टाकणारी बातमी!  

ऑटो एक्सपो 2023 मध्ये टाटा मोटर्स आणि महिंद्रा

या शिवाय, या ऑटो एक्सपोमध्ये टाटा मोटर्सच्या नव्या हॅरियर आणि सफारी या दोन्ही SUV लॉन्च होऊ शकतात. याच बरोबर टाटा अपल्या नव्या इलेक्ट्रिक कार अल्ट्रोज EV आणि पंच EV वरूनही पडदा उठवू शकते. 

ऑटो एक्सपो 2023 मध्ये ह्युंदाई आणि टोयोटा

ह्युंदाईसाठीही हा ऑटो एक्सपो जबरदस्त ठरणार आहे. यात कंपनी आपले मोस्ट पॉप्युलर आणि बेस्ट सेलिंग SUV क्रेटाचे फेसलिफ्ट मॉडेल सादर करू शकते. याच बरोबर ह्युंदाई आयोनिक 5, कोना इलेक्ट्रिक फेसलिफ्ट, न्यू जनरेशन कोना आणि न्यू मायक्रो SUV देखील आणण्याच्या तयारीत आहे.