Car Tips: कारमधील या बटणाचा योग्य वापर कसा होतो? जाणून घ्या कसं काम करतं

Air Recirculation Button In Cars: अनेकदा कारमधून प्रवास करताना उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. यासाठी आपण कारमधील वातावरण मेंटेन ठेवण्यासाठी एअर कंडिशन सुरु करतो. तेव्हा कुठे आपल्याला दिलासा मिळतो. पण तुम्ही कधी पाहिलं आहे का एसीच्या बाजूला आणखी एक बटण असतं.

Updated: Nov 6, 2022, 09:56 PM IST
Car Tips: कारमधील या बटणाचा योग्य वापर कसा होतो? जाणून घ्या कसं काम करतं title=

Air Recirculation Button In Cars: अनेकदा कारमधून प्रवास करताना उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. यासाठी आपण कारमधील वातावरण मेंटेन ठेवण्यासाठी एअर कंडिशन (Air Condition) सुरु करतो. तेव्हा कुठे आपल्याला दिलासा मिळतो. पण तुम्ही कधी पाहिलं आहे का एसीच्या बाजूला आणखी एक बटण असतं. कारच्या सेंट्रल कन्सोलवर किंवा एसी कंट्रोल्सजवळ हे बटण पाहिलं असेल. एअर रिसर्क्युलेशनसाठी हे बटण दिलेलं असतं. पण ते कसं काम करतं याबाबत अनेकांना माहिती नाही. चला तर मग याबाबत जाणून घेऊयात. 

एअर-रिसर्क्युलेशनचा वापर

कारची एअर-रिसर्क्युलेशन सिस्टम बटणाद्वारे कारमधील हवा नियंत्रित केली जाते. हे बटण उन्हाळ्याच्या दिवसात फायदेशीर ठरतं. एसीचं कुलिंग तात्काळ थंड करण्यास मदत होते. याचा वापर करून केबिन लगेच थंड होते. जर रिसर्क्युलेशन बटण दाबल्यानंतर कारचा एसी केबिन थंड करण्यासाठी बाहेरील गरम हवा वापरत नाही तर कारच्या आतल्या थंड हवेचा वापर करतो.

बाहेरील गरम हवेमुळे एसीला केबिन थंड करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. यामुळे केबिन थंड होण्यास वेळ लागतो, परंतु एकदा का कारच्या केबिनची हवा थंड झाली की, एअर-रिसर्क्युलेशन चालू करता येते. जेणेकरून एसी कारचे केबिन सहज थंड करू शकते. उन्हाळ्याच्या हंगामात रीसर्क्युलेशन सिस्टम वापरणे फायद्याचं ठरतं.

तुम्ही Maruti Swift घ्यायच्या विचारात असाल तर जरा थांबा, कारण कंपनी लवकरच...

हिवाळ्यात रिसर्क्युलेशन वापरू नका. कारण बाहेर थंड वातावरण असताना त्याची गरज भासत नाही. त्या तुलनेत उन्हाळ्यात एसीसोबत एअर-रिसर्क्युलेशन बटण वापरणं योग्य ठरतं. थंडीच्या मोसमात याचे फारसे फायदे नसतात.