Truecaller एक अतिशय उपयुक्त मोबाइल अॅप आहे. या प्लॅटफॉर्मवर बरीच वैशिष्ट्ये आहेत जी सर्वांना परिचित आहेत. स्मार्टफोन युजर्स Spam कॉल आणि Unknown Numbers शोधण्यासाठी Truecaller चा वापर करतात. याचे अनेक फायदे आहेत. आपल्याला येणारा एखादा फोन कॉल (Phone call) कुठून आला, कुणाच्या नावे तो नंबर आहे, तो बोगस नंबर आहे का यासारख्या बाबींची खातरजमा करण्यासाठी या ॲपचा (Mobile app) वापर करण्यात येतो. स्पॅम कॉल आणि अनोळखी नंबर यांची माहिती मिळवण्यासाठी या ॲपचा उपयोग होतो.
याचे अनेक फायदे आहेत. ट्रू कॉलर तुम्हाला फोन करणार्या व्यक्तीचा कॉलर आयडी पाहण्यास मदत करतो.मात्र स्पॅम कॉलचे (spam call) वाढते प्रमाण लक्षात घेऊन स्पॅम कॉल रोखण्यासाठी नवीन फीचर (features) आणण्यात आले आहे. त्याच्या मदतीने तुम्ही स्कॅम कॉल टाळू शकता. याद्वारे तुम्ही अनोळखी नंबरवरून येणाऱ्या महत्त्वाच्या कॉलला सहज उत्तर देऊ शकता.
वाचा: 116 वर्षात सहा वेळा बदलला झेंडा,स्वातंत्र्याआधी असा होता भारताचा राष्ट्रध्वज
स्पॅम कॉल आणि एसएमएस लक्षात ठेवून, ट्रूकेलरने त्याच्या प्लॅटफॉर्मवर स्पॅम स्टॅटिस्टिक्स फीचर जोडले आहे. या वैशिष्ट्याच्या मदतीने नाव आणि आकडेवारी पाहून त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा एक विशेष मार्ग विकसित केला आहे. यामध्ये अलीकडच्या काळात नंबरने केलेल्या स्पॅम कॉलची संख्या, हे कॉल सहसा किती वेळा येतात आणि स्पॅम मार्किंगमधील वरच्या आणि खालच्या ट्रेंडची माहिती समाविष्ट असते.
तसेच काहीजणांना दिवसभरात अनलिमिटेड कॉल येतात. यामध्ये स्पॅम कॉल आणि चुकीच्या नंबरचा समावेश असतो. या प्रकरणात, तुम्ही Truecaller चे प्रगत कॉल-ब्लॉकिंग वापरू शकता. Truecaller दररोज स्पॅम लिस्ट अपडेट करते. त्यामुळे ते देखील अपडेट करायला विसरू नका (प्रीमियम युजर्ससाठी हे आपोआप होते). जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट देशातून किंवा नंबर सीरिजमधून कॉल येतात आणि तुम्ही त्या ठिकाणी कधीही गेला नसता, तर Truecaller सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्ही $ चिन्हावर टॅप करून त्या सर्वांना ब्लॉक करू शकता. हा प्रगत पर्याय सर्व युजर्सना मोफत उपलब्ध आहे.