Harley Davidson ने आणली 3 चाकांची जबरदस्त बाईक, किंमत इतकी की टॉप मॉडेल Scorpio खरेदी करु शकता

Harley Davidson New Bike: हार्ले डेव्हिडसनच्या नवीन  बाईकमध्ये पुढे एक चाक आणि दोन चाक मागे असणार आहेत. दुचाकीवर दोन लोक बसू शकतात. यात आरामदायी राइडसाठी फ्लोअरबोर्ड आणि सरळ राइडिंग पोझिशन मिळते.

Updated: Jan 22, 2023, 08:47 AM IST
Harley Davidson ने आणली 3 चाकांची जबरदस्त बाईक, किंमत  इतकी की टॉप मॉडेल Scorpio खरेदी करु शकता title=
Harley Davidson New Freewheeler Trike

Harley Davidson Freewheeler Trike: हार्ले डेव्हिडसनने (Harley Davidson) जागतिक बाजारपेठेत नवीन बाईक लॉन्च केली आहे. या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे यात 3 चाके देण्यात आली आहेत. Harley Davidson Freewheeler Trike असे या बाईकचे नाव आहे. कंपनीची ही बाईक आधीच जागतिक बाजारपेठेत आली होती, आता ती अपडेट (update version) करण्यात आली आहे. (Harley Davidson New Bike) हार्लेने फ्रीव्हीलरला डार्क एलिमेंट्स अत्याधुनिक केले आहे, त्यामुळे बाइकचा पुढचा भाग, हेडलॅम्प नॅसेल, टँक कन्सोल, हात आणि पायाने ही बाईक नियंत्रित करु शकता. पावरट्रेन आणि एग्जॉस्टला ब्लॅक आउट करण्यात आले आहे.

या बाईकची फीचर्स जाणून घ्या 

या बाईकला एक पुढचे चाक असेल आणि दोन मागे असणार आहेत. दुचाकीवर दोन लोक आरामात बसू शकतात. यात आरामदायी राइडसाठी फ्लोअरबोर्ड आणि सरळ राइडिंग पोझिशन मिळते. सामान ठेवण्यासाठी मागील बाजूस एक डिक्की देखील आहे, ज्याची क्षमता 55 लीटर आहे. याच्या मागील बाजूस 18-इंच चाके आहेत, तर पुढील बाजूस 15-इंच चाके वापरण्यात आली आहेत. 

बाईक सहज रिव्हर्स करण्यासाठी याला रिव्हर्स गियर देखील देण्यात आला आहे. बाईकला कॉर्नरिंग एन्हांस्ड इलेक्ट्रॉनिकली लिंक्ड ब्रेकिंग, कॉर्नरिंग एन्हांस्ड अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), कॉर्नरिंगवर्धित ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आणि कॉर्नरिंग वर्धित ड्रॅग-टॉर्क स्लिप कंट्रोल सिस्टम मिळते.

बाईकची इंजिन क्षमता आणि किती किंमत ?

बाईकमध्ये मिलवॉकी-एट 114 पॉवरट्रेनचा सर्पोट आहे, जी 4,750 आरपीएमवर 88 बीएचपी आणि 165 एनएमचा पीक टॉर्क आउटपुट देत आहे. तसेच गिअरबॉक्स 6-स्पीड युनिट देण्यात आले आहे. जागतिक बाजारात या बाईकची किंमत  अमेरिकन डॉलर 29,999 पासून सुरु होते. अर्थात जवळपास 23.5 लाख रुपये आहे. म्हणजेच, तुम्ही स्कॉर्पिओचे टॉप मॉडेल त्याच्या बेस व्हेरियंटमध्ये घेऊ शकता. फ्रीव्हीलर व्यतिरिक्त, हार्ले डेव्हिडसनने 120 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी 7 लिमिटेड एडिशन मॉडेल देखील सादर केली आहेत. याशिवाय, नाइटस्टरच्या नवीन स्पेशल एडिशनचे अनावरण करण्यात आले आहे.