गूगल ने लॉन्च केलं UPI बेस्ड पेमेंट अ‍ॅप 'तेज'

डिजिटल पेमेंटचं महत्व ओळखून गूगलने भारतात यूपीआय बेस्ड एक मोबाईल पेमेंट अ‍ॅप लॉन्च केलं आहे. ‘तेज’ असे या अ‍ॅपचे नाव असून हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉईड आणि iOS दोन्हीसाठी उपलब्ध आहे.

Updated: Sep 18, 2017, 02:19 PM IST
गूगल ने लॉन्च केलं UPI बेस्ड पेमेंट अ‍ॅप 'तेज' title=

नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटचं महत्व ओळखून गूगलने भारतात यूपीआय बेस्ड एक मोबाईल पेमेंट अ‍ॅप लॉन्च केलं आहे. ‘तेज’ असे या अ‍ॅपचे नाव असून हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉईड आणि iOS दोन्हीसाठी उपलब्ध आहे.

हे अ‍ॅप यूपीआयमुळे एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय इत्यादी बॅंकांशी कनेक्टेड आहे. या अ‍ॅपच्या मदतीने यूजर्स थेट त्यांच्या बॅंक अकाऊंटमधून पेमेंट करू शकतील. यासाठी वेगळं खातं उघडण्याची अजिबात गरज नाही. 

यासोबतच या अ‍ॅपमध्ये एक कॅश मोडही आहे. ज्याच्या मदतीने कोणताही ‘तेज’ अ‍ॅप यूजर आजूबाजूला असलेल्या कोणत्याही ‘तेज’ अ‍ॅप यूजरला थेट पैसे पाठवू शकतो. यासाठी कोणतेही बॅंक डिटेल्स आणि फोन नंबर शेअर करण्याची गरज नाही. तसेच, या अ‍ॅपमध्ये QR कोड स्कॅन करूनही पेमेंट करण्याची सुविधा आहे. गूगलने मायक्रोमॅक्स, पॅनासॉनिक, लावा आणि नोकिया सारख्या कंपन्यांना डिस्ट्रिब्यूशन पार्टनर बनवलं आहे. 

इतर पेमेंट वॉलेट्ससारखं यातही यूजर्सना स्क्रॅच कार्ड, रेफरल रिवॉर्ड आणि लकी संडे लकी ड्रॉसारखे ऑफर्स मिळतील. कंपनीने हेही सांगितलं आहे की, दुकानदार त्यांच्या अकांऊटमध्ये डिजिटल पेमेंट घेण्यासाठीही याचा वापर करू शकतात. ५० हजार रूपये प्रति महिना पैसे घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही.