दिवाळीसाठी Online Shopping करताय? मग थांबा, अन्यथा होईल घात

Online Shopping Tips : सणांच्या दिवसांमध्ये भरपूर ऑफर असल्याने ग्राहकांचा ऑनलाइन खरेदीकडे कल वाढला आहे. मात्र, खरेदी केलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात अदलाबदल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Updated: Oct 14, 2022, 03:43 PM IST
दिवाळीसाठी Online Shopping करताय? मग थांबा, अन्यथा होईल घात title=

Cyber Crime : सणांच्या दिवसांमध्ये भरपूर ऑफर असल्याने ग्राहकांचा ऑनलाइन खरेदीकडे कल वाढला आहे. विशेषत: लोक Amazon, Flipkart, Myntra आणि Ajio सारख्या ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) प्लॅटफॉर्मवरून भरपूर खरेदी करतात. या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून खरेदी करतात कारण एखादी वस्तू विकत घेतली का ती वस्तू कुठेही न जाता घरपोच येते.

परंतु तुम्हाला ते उत्पादन आवडत नसले तरी तुम्ही ते दुसरे मागवून परत करू शकता किंवा पैसे परत मिळवू शकता. ऑनलाइन शॉपिंगचे अनेक फायदे आहेत पण त्यासोबत फसवणुकीचा धोकाही येतो. सेल दरम्यान खरेदी करताना तुम्हाला काही खास गोष्टींची काळजी घ्यावी लागेल जेणेकरून तुम्ही कोणत्याही प्रकारची ऑनलाइन फसवणूक टाळू शकता.

बनावट ई-कॉमर्स साइट

सायबर गुन्हेगारांसाठी 'बनावट ई-कॉमर्स साइट्स' असते. या बनावट साइट्स अगदी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि इतर लोकप्रिय साइट्ससारख्या दिसतात. सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम किंवा मेसेजच्या माध्यमातून या साइट्सचा प्रचार केला जातो. त्याचबरोबर अर्ध्या किमतीत वस्तू विकली जाते. त्यानंतर वस्तूची खरेदी केल्यानंतर अशा वेबसाइट्स रातोरात गायब होतात. जर तुम्ही या साइट्सला भेट दिली असेल किंवा लिंकवर क्लिक केले असेल तर तुम्ही सायबर ठगांच्या तावडीत नक्कीच अडकणार आहात.

बंपर सवलत ऑफर

या बनावट वेबसाइट्सवर तुम्हाला 70% ते 90% च्या बंपर डिस्काउंट ऑफर दिसतील.  खरतर बनावट उत्पादने विकणाऱ्या कंपन्या 90 ते 95% पर्यंत सूट देण्याचे आश्वासन देतात आणि बनावट उत्पादने तुमच्यापर्यंत पोहोचवतात. या कंपन्या फसवणुकीसाठीच बनवल्या जात असल्याने जेव्हा असंख्य लोक त्यांच्या ऑफर्सच्या भानगडीत पडून पैसे देतात, तेव्हा या कंपन्या पैसे घेऊन गायब होतात.

फसवणूक टाळण्यासाठी या चरणांचे अनुसरण करा

ऑनलाइन खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. तेथे कोणत्याही अज्ञात वेबसाइटवर खरेदी करून पैसे देऊ नका. मेसेज किंवा ईमेलमध्ये आढळलेल्या अज्ञात लिंकवर क्लिक करणे टाळा. युजर्सने प्रमोट केलेल्या लिंकवर क्लिक केल्यास त्यांचा फोनही हॅक होऊ शकतो. अशा लिंकवर क्लिक करणे टाळा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी फोन किंवा मेसेजद्वारे वैयक्तिक किंवा बँकिंग तपशील शेअर करू नका.

वाचा : मोबाईलचा डेटा लवकर संपतो? मग ही बातमी तुमच्या फायद्यासाठी!

जर तुम्ही ऑनलाईन फसवणुकीचे बळी असाल तर हे काम करा

जर तुमच्यासोबतही ऑनलाइन फसवणूक झाली असेल, तर तुम्हाला त्याची लगेच तक्रार करावी लागेल. फसवणूक झाल्यास तुम्हाला 1930 डायल करावा लागेल. याशिवाय तुम्ही http://cybercrime.gov.in या वेबसाइटवर जाऊन तक्रार नोंदवू शकता. सायबर गुन्हे घडल्यानंतर तक्रार करण्यास उशीर करू नका, हे लक्षात ठेवा. जर उशीर झाला तर सायबर फसवणुकीतून पैसे मिळण्याची शक्यता कमी होते.

सुरक्षित राहण्यासाठी या टिपांचे फॉलो करा

- ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी नेहमी URL https:// ने सुरू होत आहे का ते तपासा.

- फक्त कंपनीच्या मुख्य वेबसाइटला भेट द्या. जाहिरातींनी लिहिलेल्या साइटवर क्लिक करणे टाळा.

-जेव्हा तुम्ही URL मध्ये लॉक चिन्ह तपासाल तेव्हा तुम्हाला साइटची सुरक्षा पातळी कळेल.

- अँटी-व्हायरस अद्ययावत ठेवा. अनोळखी व्यक्तीने सांगितलेले अॅप कधीही डाउनलोड करू नका.

- मेसेजमध्ये सापडलेल्या लिंक्सबाबत काळजी घ्या. अज्ञात लिंकवर क्लिक करणे टाळा.

- तुमच्या खात्याचा पासवर्ड नियमितपणे बदलत राहा. तुमचा बँक डेटा कोणाशीही शेअर करणे टाळा.