फेसबुक नाही तर 'हे' आहेत तरुणांचे आवडते अॅप्स!

फेसबुक सुरु झाल्यापासूनच तरुणाईला त्याची भुरळ पडली आहे. 

Updated: Aug 14, 2018, 03:58 PM IST
फेसबुक नाही तर 'हे' आहेत तरुणांचे आवडते अॅप्स! title=

मुंबई : फेसबुक सुरु झाल्यापासूनच तरुणाईला त्याची भुरळ पडली आहे. मग भारत, अमेरिका किंवा इतर कोणताही देश असो. काही रिपोर्ट्सवरुन असे सिद्ध झाले आहे की, तरुणाईला फेसबुकचे व्यसन लागले आहे आणि तरुण पीढी अधिकाधिक वेळ त्यावर वाया घालवत आहे. पण अलिकडेच झालेल्या सर्व्हेतून असे दिसून आले आहे की, फेसबुक नाही तर दुसरे अॅप्स तरुणाईला अधिक पसंत आहेत.

हे अॅप आहेत लोकप्रिय

पियु रिसर्च सेंटरद्वारा केलेल्या सर्व्हेनुसार, अमेरिकन तरुणांमध्ये फेसबुक नाही तर दुसरे अॅप्स लोकप्रिय आहेत. अमेरिकेत सुमारे ९५% लोकांकडे स्मार्टफोन्स आणि ४५% तरुण अधिकाधिक वेळ ऑनलाईन असतात.
सर्व्हेनुसार, फेसबुकची जागा आता युट्युब, इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटने घेतली आहे. मॉनिका एंडरसन आणि जिंगजिंग जिंआंग द्वारा केलेल्या या सर्व्हेत ५१% अमेरिकन तरुण (वय वर्ष १३-१७) यांचे म्हणणे आहे की, ते फेसबुकचा वापर करतात. तर ८५%  लोक युट्युब, ७२% इंस्टाग्राम आणि ६२% स्नॅपचॅट यांसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करतात.

सोशल मीडियाचा प्रभाव नेमका कसा?

३१% तरुण म्हणतात की, सोशल मीडियाचा प्रभाव सकारात्मक आहे तर २४% तरुणांना सोशल मीडियाचा प्रभाव नकारात्मक वाटतो. ४५% लोकांना सोशल मीडियाचा प्रभाव सकारात्मक आणि नकारात्मकही वाटत नाही.