परवानगी नाकारल्यानंतरही तुमच्या प्रत्येक पावलावर 'गूगल'ची नजर

 अॅन्ड्रॉईड यूजर्स आणि जगभरातील लाखो आयफोन यूझर्सशी ही प्रतारणा

Updated: Aug 14, 2018, 01:05 PM IST
परवानगी नाकारल्यानंतरही तुमच्या प्रत्येक पावलावर 'गूगल'ची नजर title=

मुंबई : तुम्ही परवानगी दिली असो किंवा नसो... पण, एका अदृश्य डोळ्याची तुमच्यावर सतत नजर आहे... हा अदृश्य डोळा आहे 'गूगल'चा... तुमच्या प्रत्येक लोकेशनचा ठावठिकाणा गूगलकडे आहे... यासाठी तुमच्या परवानगीची गूगलला गरज वाटत नाही... तुमच्या प्रत्येक ठिकाणाचा रेकॉर्ड गूगलकडे उपलब्ध आहे, ही धक्कादायक माहिती समोर आलीय न्यूज एजन्सी 'असोसिएटेड प्रेस'च्या (एपी) चौकशीतून... 

'गूगल'चा दावा खोटा?

याआधी गूगलच्या म्हणण्यानुसार, तुम्हाला नको असल्यास तुम्ही कधीही आपलं लोकेशन सेटिंग बंद करू शकता... आणि यामुळे लोकेशन स्टोअर होणं बंद होईल.... आणि त्यामुळे तुमची लोकेशन हिस्ट्रीही बंद होईल... पण, हा दावा साफ खोटा असल्याचं एपीच्या पडताळणीतून समोर आलंय. तुम्ही लोकेशन हिस्ट्री बंद केल्यानंतरही गूगलचे काही अॅप तुमच्या परवानगीविना आपोआपच तुम्ही उपस्थित असलेल्या जागेची माहिती जमा करतात. धक्कादायक म्हणजे, चॉकलेट चिप कुकीज आणि किड्स सायन्स किटस यांसारखे काही सर्चदेखील तुमच्या अक्षांश आणि देशांतराच्या जागांची नोंद करतात... यांचा तुमच्या लोकेशनशी काहीही संबंध नाही. 

गोपनियतेचा भंग?

अॅन्डॉईड आणि आयफोमध्ये गूगलच्या अशा अनेक सर्व्हिस आहेत ज्या पर्सनल सेटिंग ठेवल्यानंतरही तुमच्या जागेच्या माहितीचा रेकॉर्ड ठेवतात. यासाठी गूगल तुम्हाला तुमच्या लोकेशनशी निगडीत माहितीच्या वापरासाठी अगोदरच परवानगी मागतं. तुमच्या प्रत्येक ठिकाणाची माहिती हा गोपनियतेचा भंग असल्याचा दावाच यात करण्यात आलाय. 

सर्च किंवा गूगल मॅपवर विश्वास टाकणाऱ्या जवळपास दोन अब्ज अॅन्ड्रॉईड यूजर्स आणि जगभरातील लाखो आयफोन यूझर्सशी ही प्रतारणाच आहे, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको.