गुगल मॅपचे नवे अपडेट...

९० च्या दशकात आलेला मारिओ गेमचे प्रस्त २००७ पर्यंत अगदी चांगलेच वाढले. 

Updated: Mar 13, 2018, 09:57 AM IST
गुगल मॅपचे नवे अपडेट... title=

नवी दिल्ली : ९० च्या दशकात आलेला मारिओ गेमचे प्रस्त २००७ पर्यंत अगदी चांगलेच वाढले. लहान मुलांमध्ये हा गेम अतिशय लोकप्रिय ठरला. आवाजावरुनही हा गेम अतिशय सहज ओळखला जातो. तसंच टी.व्ही. आणि कंप्म्युटर या दोन्हींवर हा गेम लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या गेमची लोकप्रियता लक्षात घेऊन गुगलने त्याच्या चाहत्यांसाठी एक खास गिफ्ट आणले आहे.

ही खास सुविधा सुरू

गुगलने १० मार्चला मारिओ डे च्या निमित्ताने एक खास सुविधा युजर्ससाठी सुरू केली आहे. आता गुगल मॅपवर मारिओ तुम्हाला रस्ता दाखवले. यासाठी गुगलने मारिओ गेमची निर्मिती करणाऱ्या निन्टेंडो कंपनीसोबत करार केला आहे. या करारानुसार, आता गुगल मॅपवर रस्ता दाखवण्याचे काम मारिओ करत आहे. या नव्या फिचरचा फायदा अॅनरॉईड आणि आयओएस हे दोन्ही युजर्स घेऊ शकतात.

यापूर्वी गुगल मॅप वापरताना फोनच्या स्क्रिनवर एक चालणारा बाण दिसत असे. आता याच्या ऐवजी मारिओ आपल्या कारमध्ये बसलेला दिसेल आणि तुमचा दिशादर्शक होईल.

या फिचरचा वापर कसा कराल

गुगल मॅपवर मारिओ पाहण्यासाठी तुम्हाला मॅप अपडेट करावा लागेल. त्यानंतर जेव्हा तुम्ही डेस्टिनेशन पाईंट टाकाल आणि तुम्हाला एक प्रश्नचिन्ह दिसेल. असे ‘?’. यावर क्लिक करुन तुम्हाला मारिओ मोड अॅक्टिव्हेट करा. त्यानंतर तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे मारिओ देखील तुमच्या सोबतीने गुगल मॅपवर चालेल. गुगल मॅपवर मारिओ मोड १० मार्चपासून सुरू करण्यात आले असून ते पूर्ण ७ दिवसांपर्यंत चालेल.