world cup

महेंद्रसिंह धोनी वर्ल्ड कपनंतर घेणार निवृत्ती?

बातमी आहे क्रिकेट विश्वातून..... बातमी भारतीय क्रिकेटचा यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीबद्दलची आहे. वर्ल्ड कपनंतर धोनी क्रिकेटमधून संन्यास घेण्याचे मोहम्मद शमीने प्रेस कॉन्फ्रेंन्समध्ये संकेत दिले आहे. 

Mar 13, 2015, 07:49 PM IST

१९ मार्चला भारत वि. बांगलादेश क्वार्टर फायनल

वर्ल्ड कपच्या दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना १९ मार्च रोजी मेलबर्नमध्ये खेळण्यात येईल.

Mar 13, 2015, 05:15 PM IST

राष्ट्रगीत सुरू आणि विराट पाहतो कोणाकडे ?

विराट कोहली म्हणजे सध्याच्या भारतीय टीममधील स्टार प्लेअर. त्याची मैदानातील खेळाची स्टाईल आणि मैदानाबाहेरील स्टाईल या दोन्हींची चर्चा नेहमीच होत असते. विराट कोहलीचा असा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Mar 12, 2015, 01:56 PM IST

वर्ल्डकपमध्ये तो चांगला खेळतोय, म्हणून बलात्काराचे आरोप मागे

वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीचा बांगलादेशातील एका खेळाडूला फायदा होतांना दिसतोय. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रूबेल हुसेनवर बलात्काराचे आरोप होते. 

Mar 11, 2015, 12:41 PM IST

वर्ल्डकप आम्हीच जिंकणार : रवी शास्त्री

टीम इंडियाची विजयी घौडदौड सुरु आहेत. सलग पाचवा विजय मिळविल्याने आत्मविश्वास वाढलेल्या टीमचे व्यवस्थापक रवी शास्त्री यांनी वर्ल्डकप आम्हीच जिंकणार, असा दावा केलाय.

Mar 10, 2015, 06:14 PM IST

ऑस्ट्रलियाने तोडले वर्ल्ड कपमध्ये दोन भारतीय रेकॉर्ड

 ऑस्ट्रेलियाने आज झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानला क्रिकेटचा धडा शिकवून वर्ल्ड कपमध्ये एका इनिंगमध्ये सर्वाधिक रन्स आणि सर्वाधिक अंतराने विजयाचे दोन भारतीय रेकॉर्ड तोडले आहे. 

Mar 4, 2015, 09:14 PM IST

ट्राय सिरीजमध्ये पराभूत, पण आता का जिंकतेय टीम इंडिया- किर्ती आझादचा खुलासा

 वर्ल्ड कपमध्ये तयार करण्यात आलेल्या खेळपट्ट्या या तिरंगी मालिकेतील खेळपट्ट्याच्या तुलनेत अधिक सपाट असल्यामुळे भारतीय संघाने वर्ल्ड कपमध्ये एकही सामना गमावला नसल्याचा खुलासा भारताचे माजी ऑलराउंडर किर्ती आझाद यांनी केला आहे. भारताने तिरंगी मालिकेत एकही सामना जिंकलेला नव्हता. पण वर्ल्ड कपच्या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. 

Mar 3, 2015, 08:03 PM IST

व्हाट्सअॅप बाबा तोंडावर पडला, पाकिस्तान पराभूत

वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत आज २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यात पाकिस्तान विजय होईल असा दावा करण्यात आला होता. तर ऑस्ट्रेलिया  जिंकेल अस म्हटलं होतं. मात्र, यापैकी काहीही झालेले नाही. पाकिस्तानचा वेस्ट इंडिजकडून पराभव झालाय. तर ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झालाय. 

Feb 21, 2015, 10:42 AM IST

वर्ल्ड कपच्या सर्व मॅच फिक्स, व्हॉट्सअॅपवर व्हायरल मेसेजमध्ये विजेत्याचे नाव?

 आज काल व्हॉट्सअॅपवर एक मेसेज फिरतो आहे. या व्हायरल मेसेजमुळे एक खळबळ उडाली आहे. मीडियात आलेल्या काही बातम्यांनुसार या मेसेजमध्ये वर्ल्ड कपच्या सर्व मॅच फिक्स असल्याचा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार या कथीत मेसेजमध्ये प्रत्येक मॅचचा विजेता आणि वर्ल्ड कपच्या विजेत्याचे नावही देण्यात आले आहे. 

Feb 19, 2015, 05:00 PM IST

'मुलींपासून दूर राहा, फेसबुक-ट्विटर सांभाळून वापरा'

14 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. संघ व्यवस्थापनानं फेसबुक-ट्विटरच्या वापरात सावधगिरी बाळगण्याचे आणि महिलांपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. 

Feb 11, 2015, 04:46 PM IST

वर्ल्डकप २०१५ : मोहित ठरणार टीम इंडियाचा 'पाॅवर प्ले' भिडू...

ईशांत शर्मा वर्ल्ड कपमधून आऊट झाल्यानं मोहित शर्माला टीममध्ये स्थान देण्यात आलंय. दुखापतग्रस्त ईशांतमुळे मोहितचं नशिब फळफळलंय. त्यामुळे मोहित या संधीचं सोन करण्यात यशस्वी ठरतो का? ते पाहण महत्वाचं ठरणार आहे. 

Feb 11, 2015, 01:00 PM IST

भविष्यवाणी : वर्ल्डकप २०१५ अफगाणिस्तान टीमच जिंकणार!

'वर्ल्डकप २०१५'चं महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच या युद्धात विजयी होणाऱ्या महायोद्ध्याचं नाव जाहीर करण्यात आलंय... तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे हे? 

Feb 11, 2015, 08:08 AM IST