प्रियांकानं घेतली काँग्रेसची मिटींग; मोठी जबाबदारी पडणार?

प्रियांका गांधी यांनी मंगळवारी प्रियंका गांधींनी काँग्रेसची महत्त्वाची बैठक घेतली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत खुद्द राहुल गांधी उपस्थित नव्हते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 8, 2014, 11:01 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
प्रियांका गांधी यांनी मंगळवारी प्रियंका गांधींनी काँग्रेसची महत्त्वाची बैठक घेतली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत खुद्द राहुल गांधी उपस्थित नव्हते.
प्रियंका गांधींनी बोलावलेल्या या बैठकीत अहमद पटेल, जयराम रमेश, जनार्दन द्विवेदी, मधुसुदन मिस्त्री, अजय माकन, मोहन गोपाल हे ज्येष्ठ नेते सामील झाले होते. काँग्रेसच्या १७ जानेवारीला होणाऱ्या निर्णयाआधीची ही महत्त्वाची बैठक असल्याचं सांगण्यात येतंय. १७ जानेवारी रोजी एआयसीसीच्या संमेलनात राहुल गांधी यांना पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषिणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
काँग्रेसनं मात्र राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या नेत्यांची बैठक प्रियांका गांधी यांनी बोलावली असली तरी त्याला फार महत्त्व नसल्याचं म्हटलंय. ‘प्रियांका गांधी काँग्रेसच्या राजकारणात नेहमीच सक्रिय राहिल्यात. त्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत उपस्थित राहणं ही काही आश्चर्यकारक गोष्ट नाही’ असं काँग्रेसनं म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.