www.24taas.com, झी मीडिया, रायबरेली
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी आपली संपत्ती जाहीर केलीय. आपल्याकडे एकूण ९ करोड २८ लाख ९५ हजार रुपये असल्याचं सोनियांनी जाहीर केलंय.
सोनियांकडे असलेल्या एकूण संपत्तीमध्ये सोनियांनी नऊ लाखांचाही उल्लेख केलाय... हे नऊ लाख म्हणजे सोनियांनी आपल्या मुलाला - खासदार राहुल गांधी यांना कर्ज स्वरुपात दिलेली रक्कम आहे.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, २००९ सालीही सोनियांनी आपली संपत्ती जाहीर केली होती. २००९ सालापेक्षा यंदाची सोनियांची संपत्ती सहा पटींनी अधिक आहे. वित्तीय वर्ष २०१२-१३ मध्ये दाखल केलेल्या आयकर रिटर्नमध्ये सोनियांनी आपली संपत्ती १४ लाख २१ हजार ७४० रुपये असल्याचा उल्लेख केला होता.
खासदार राहुल गांधी यांच्यासोबत जिल्हा निर्वाचन अधिकारी अदिती सिंह यांच्यासमोर सोनियांनी नामांकनपत्र दाखल केलं. सोनियांकडे एकूण ९ करोड २८ लाख ९५ हजार रुपये संपत्ती आहे. यातील २ करोड ८१ लाख ५० हजार ३८७ रुपये ७३ पैशांची चल संपत्ती आहे तर ६ करोड ४७ लाख ४४ हजार ९०० रुपयांच्या अचल संपत्तीचा समावेश आहे. सोनियांकडे आत्ताही एकही कार नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.