जालना : येथे शिवसेनेकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली. प्रत्येक १५ हजार रुपये आणि २ लाख रुपयांचे विमाकवच देण्यात आले.
जालना जिल्हा शिवेसेनेच्यावतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली. शहरातील फुलंब्रीकर नाट्यगृहात शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते ही मदत करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना प्रत्येकी १५ हजार रुपये, साडीचोळी आणि २ लाख रुपयांचा विमा देण्यात आला.
यावर्षी जालना जिल्ह्यात दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे ३२ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले होते. दरम्यान घरातला कर्ता व्यक्तीच सोडून गेल्यानं त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व्हावी म्हणून जिल्हा शिवसेनेने आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला. मदतीनंतर पीडित कुटुंबीयांचे गोऱ्हे यांनी सांत्वन केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.