shiv sena

शिवसेनेने थोपटले सरकार विरोधात दंड

शिवसेनेने थोपटले सरकार विरोधात दंड

Jul 15, 2015, 11:05 AM IST

शिवसेनेने थोपटले सरकार विरोधात दंड

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकीकडे विरोधकांच्या एकीचा सामना सरकार करत असताना आता सरकारला सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आमदारांचाही सामना करावा लागणार आहे. शिवसेना आमदारांच्या बैठकीत बहुतांश आमदारांचा सूर सरकारच्या विरोधात होता. संपूर्ण कर्जमाफीच्या विरोधकांच्या मागणीला पाठिंबा देण्याबरोबरच भाजपाच्या मंत्र्यांचे घोटाळे अधिवेशनात बाहेर काढण्याची भूमिका घेऊन शिवसेना आमदारांनी दंड थोपटले आहेत.

Jul 14, 2015, 04:42 PM IST

सिध्दीविनायक शिवसेनेकडे तर शिर्डी साईबाबा संस्थान भाजपकडे

शिर्डीमधल्या साईबाबा संस्थानाचं अध्यक्षपद, भाजपकडे जाणार आहे. त्याचवेळी मुंबईतलं सिध्दीविनायक मंदिराचं अध्यक्षपद शिवसेनेला मिळणार आहे. तर कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिराच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय व्हायचा आहे. 

Jul 13, 2015, 11:12 AM IST