sartaj aziz

सुषमा स्वराज पाकिस्तानच्या खोटारडेपणावर बरसल्या

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार सचिव सरताज अजीज यांना ट्विटरवरुन खडेबोल सुनावले आहेत. 

Jul 10, 2017, 04:07 PM IST

हार्ट ऑफ एशिया सम्मेलनाला सुरुवात

दोन दिवसीय हार्ट ऑफ एशिया सम्मेलनाला सुरुवात झाली आहे. आशिया खंडात शांती, परस्पर सहकार्य आणि अफगाणिस्तानातली परिस्थिती, या मुद्द्यांवर, या सम्मेलनात चर्चा होणार आहे. यासोबतच दहशतवाद आणि काश्मीरमधल्या नगरोटा हल्ल्यावरुन पाकिस्तानला कोंडीत पकडण्याची रणनिती, या बैठकीतून भारतानं आखली आहे. दरम्यान संम्मेलनाला आलेल्या सदस्यांनी सुप्रसिद्ध सुवर्णमंदिराला संध्याकाळी भेट दिली. तसंच जालियनवाला बागलाही या शिष्टमंडळानं भेट दिली. 

Dec 3, 2016, 11:06 PM IST

भारताच्या सर्जिकल हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाचावर धारण

भारताच्या सर्जिकल हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाचावर धारण बसलीये. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्याशी फोनवर संपर्क करून तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केलीय. 

Oct 3, 2016, 08:08 AM IST

अणूबॉम्ब पडला तर तुम्ही पण मराल अजीज साहेब : अब्दुल्ला

 जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी भारताला अणूबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांच्यावर चांगलीच तोफ डागली. 

Aug 27, 2015, 08:49 PM IST

आमच्याकडेही अणुबॉम्ब आहेत - सरताज अझीझ

आमच्याकडेही अणूबॉम्ब आहेत, असं पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत रिजनल सुपरपॉवर असल्यासारखा वागतोय, मग आमच्याकडेही अणुबॉम्ब आहेत, आम्हालाही स्वरक्षण करता येतं, असं सरताज अझीझ यांनी म्हटलंय.

Aug 24, 2015, 03:22 PM IST

पाकिस्तानच्या उलड्या बोंबा, कोणत्याही अटी शिवाय चर्चा करु : अझीज

पाकिस्तान भारताशी सुरक्षा सल्लागार स्तरावर बोलणी करण्यास तयार आहे. मात्र, आम्हाला कोणत्याही अटी मान्य नाहीत. अटींशिवाय चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, परंतु भारताला चर्चा करायची नाही, असा उलटा आरोप पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी पत्रकार परिषदेत केला.

Aug 22, 2015, 02:36 PM IST

26/11 हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचला गेला, पाकिस्तानी माजी गुप्तचर प्रमुख

मुंबईवरील '26/11'चा दहशतवादी हल्ला पाकिस्ताननंच केला हे कटू सत्य असून, ते कबूल करा आणि दोषींवर खटला चालवून शिक्षा करा, अशी पोलखोल खुद्द पाकच्याच गुप्तचर विभागाचे माजी महासंचालक तारीक खोसा यांनी केली आहे. या हल्ल्याचे तपास अधिकारी म्हणून काम केलेले खोसा यांनी पाकिस्तानची पोलखोल करत दहशतवादी कसाब हा पाकिस्तानी होता. लष्कर-ए-तोयबानं हल्ल्याचा कट रचला आणि कराचीतून हल्ल्या वेळी सूचना दिल्या, असंही जगजाहीर केलं आहे.

Aug 5, 2015, 09:30 AM IST

पाकिस्तानातील दहशतवादी कारवायांमध्ये भारताचा हात - सरताज अझीझ

मनोहर पर्रीकर यांच्या विधानानं पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांमध्ये भारताचा हात असल्याच्या शंकेला पाठबळ मिळतं, असा आरोप पाकिस्ताननं केला आहे. तर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील पर्रीकर यांच्या विधानानं आता पाक दहशतवादी हल्ल्यांचं खापर भारतावरच फोडेल, असं सांगत पर्रीकर यांच्या विधानाचा निषेध दर्शवला आहे. 

May 24, 2015, 02:48 PM IST

मोदींच्या दणक्यानंतर पाकिस्ताननं मानली स्वत:ची चूक

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत दहशवादाच्या सावटाखाली पाकशी चर्चा करता येणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला सुनावल्यानंतर पाकनं अखेरीस नमती भूमिका घेतली आहे. भारत - पाकमधील सचिव स्तराची बैठक होत असतानाच काश्मीरमधील हुर्रियतच्या नेत्यांशी चर्चा करण्याची वेळ चुकलीच अशी कबुली पाकिस्तानचे सुरक्षा आणि परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ यांनी दिली आहे. 

Sep 28, 2014, 04:39 PM IST