इस्लामाबाद : भारताच्या सर्जिकल हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाचावर धारण बसलीये. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्याशी फोनवर संपर्क करून तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केलीय.
पाकिस्तानी मीडियाला त्यांचे परराष्ट्र सचिव सरताज अजीज यांनी ही माहिती दिलीय. उरीमधल्या हल्ल्यानंतर भारतानं नियंत्रण रेषेपलीकडे घुसून सात दहशतवादी तळ उधळून लावले. तीसहून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.
या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी अधिका-यांमध्ये मोठा संभ्रम दिसून येतेय. याच संभ्रमातून आधी प्रत्युत्तर देण्याची भाषा करणाऱ्या पाकनं स्वतःच शांतीचा प्रस्ताव पुढे केल्याचं स्पष्ट दिसतंय. 'द न्यूज' या पाकिस्तानी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर हे वृत्त आहे.