आमच्याकडेही अणुबॉम्ब आहेत - सरताज अझीझ

आमच्याकडेही अणूबॉम्ब आहेत, असं पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत रिजनल सुपरपॉवर असल्यासारखा वागतोय, मग आमच्याकडेही अणुबॉम्ब आहेत, आम्हालाही स्वरक्षण करता येतं, असं सरताज अझीझ यांनी म्हटलंय.

Updated: Aug 24, 2015, 03:22 PM IST
आमच्याकडेही अणुबॉम्ब आहेत - सरताज अझीझ title=

इस्लामाबाद : आमच्याकडेही अणूबॉम्ब आहेत, असं पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत रिजनल सुपरपॉवर असल्यासारखा वागतोय, मग आमच्याकडेही अणुबॉम्ब आहेत, आम्हालाही स्वरक्षण करता येतं, असं सरताज अझीझ यांनी म्हटलंय.

आता अझीझ यांनी थेट हल्ला करत म्हटले आहे, की भारताचे सध्याचे वागणे बरे नाही. भारत पाकिस्तानसोबत चर्चा करण्यावर गंभीर नाही. आपण खेळलेल्या खेळी चुकीच्या असल्याचे भारतालाही कळाले आहे. 

व्याप्त काश्मीरमध्ये भारत आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांमध्ये भारताचा हात असल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत.

भारत सुपरपॉवर असल्यासारखा वागत आहे. आम्ही सुद्धा अण्वस्त्रधारी देश आहोत. आम्हाला स्वतःचा बचाव कसा करायचा हे माहिती आहे. 

भारताने पाकिस्तानला फुटीरतावाद्यांची चर्चा न करण्याची घातलेली अटी न पाळल्याने ही चर्चा रद्द करण्यात आली होती.

पाकिस्तानमधील बलुचिस्तानमधील दहशतवादी कारवायांमध्ये भारताचा हात असल्याचे दस्तावेज बनविल्याचेही म्हटले आहे. तसेच भारत-पाकिस्तानमधील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक रद्द झाल्यानंतर अझीझ यांनी ही चर्चा रद्द होण्याचे खापर भारतावर फोडले आहे. यावेळी अझीझ यांनी काश्मीरच्या मुद्द्याशिवाय चर्चा अशक्य असल्याचे म्हटले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.