काश्मीर : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी भारताला अणूबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांच्यावर चांगलीच तोफ डागली.
अजीज यांना जम्मू काश्मीर अणूबॉम्बने उडवायचा आहे
इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, जेव्हा एखादा सिनिअर डिप्लोमॅट आणि माजी परराष्ट्र मंत्री अणूबॉम्ब टाकण्याचे बोलतात, तेव्हा यात त्यांचा सणकीपणा दिसतो. मी सरताज अजीज यांना हिरोशिमा-नागासाकीचा आठवण करू देऊ इच्छितो. त्या ठिकाणी हजारो लोक मारले गेले. आता त्या ठिकाणी गवतही उगत नाही. अजीज असे करू इच्छितात का? त्यांना जम्म काश्मीर बॉम्बने उडवून द्यायचा आहे का?
अणूब़ॉम्बबद्दल बोलू नका अजीज
भारताकडेही अणूबॉम्ब आहे, असे अब्दुल्ला म्हणाले. जेव्हा मी अणूबॉम्ब चाचणीवेळी पोखरणमध्ये होतो. त्यावेळी वाजपेयीजींचे शब्द आठवतात त्यांनी सांगितले होते की, याचा वापर करणे आम्ही प्रथम असणार नाही. हे फक्त एवढ्यासाठी की लोकांनी आम्हांला गृहीत धरू नये. आम्ही आमची सुरक्षा करू शकतो.
अब्दुल्लाने सांगितले की, मी सरताज यांना सांगतो त्यांनी बॉम्बबद्दल बोलू नये, किंवा विचारही करू नये. यात निर्दोषांचे प्राण जातात. सरताज साहेब बॉम्ब पडला तर तुम्ही मराल. असे बोलतांना विचार करा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.