व्हॉट अ स्टार्ट: चुटकीचा पहिला गेस्ट सचिन?
कपिल शर्माचा प्रसिद्ध असा शो असलेल्या ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मधील गुत्थी म्हणजेच अभिनेता सुनील ग्रोवर यानं अचानक गेल्या वर्षी कपिलचा शो सोडला. आता गुत्थी नव्या अवतारात, नव्या शोमधून पुढं येणार आहे. याच महिन्यात गुत्थी अर्थात सुनील ग्रोव्हरचा नवा कॉमेडी शो सुरू होणार आहे. यात सुनील ग्रोव्हर ‘चुटकी’ नावाची भूमिका साकारणार आहे.
Feb 6, 2014, 08:18 AM ISTब्रायन लाराचे रेकॉर्ड तोडत संगकाराचं त्रिशतक!
चटगाव इथं सुरु असलेल्या श्रीलंका विरुध्द बांगलादेश कसोटीमध्ये श्रीलंकेच्या कुमार संगकारानं त्रिशतक झळकावलंय. या ट्रिपल सेंच्युरीबरोबरच त्यानं तीन जागतिक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.
Feb 6, 2014, 07:46 AM ISTसचिन तेंडुलकरला धोनीने ठोकला सॅल्युट
भारतरत्न पुरस्काराचा मानकरी ठरलेला पहिलाच खेळाडू सचिन तेंडुलकरला टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सॅल्युट ठोकलाय.
Feb 5, 2014, 04:32 PM ISTव्हिडिओ : सचिन, प्रो. राव यांना भारतरत्न प्रदान
विक्रमादित्य सचिन तेंडुलकर आणि ख्यातनाम संशोधक प्रोफेसर सी एन राव यांना आज भारतरत्न पुरस्कारानं गौरविण्यात आलं. राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला.
Feb 4, 2014, 12:52 PM ISTआयला... आपला सचिन होणार भारतरत्न!
सचिन तेंडुलकर... क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट... क्रिकेटच्या या देवाचं आता नवं नाव भारतरत्न सचिन तेंडुलकर असं होणार आहे. भारत सरकार मास्टर-ब्लास्टरला भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कारनं उद्या सन्मानित करण्यात येणार आहे.
Feb 3, 2014, 09:39 PM ISTपाणीपट्टी थकविणाऱ्यांत तेंडुलकर अन् ठाकरेही!
कधीही कोणताही कर न थकवणारा अशी ख्याती असलेला भारतातला सर्वात लोकप्रिय सेलिब्रेटी असलेल्या सचिन तेंडुलकरने पाणीपट्टी मात्र थकवलीय.
Jan 29, 2014, 02:05 PM ISTसचिन तेंडुलकर छोट्या मास्टर्ससाठी देवदूत
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि क्रिकेटचा देव छोट्या मास्टर्ससाठी देवदूत बनून आलाय. चिमुकल्यांच्या हृदयाच्या आजारावरील उपचारासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी वाडिया हॉस्पिटलला दहा लाख रुपये दान दिलेत.
Jan 22, 2014, 08:31 AM ISTसचिन तेंडुलकर पुन्हा दिसणार मैदानात
निवृत्तीनंतर मैदानाबाहेरच दिसलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा मैदानात पाहता येणार आहे... पण, यावेळी तो स्वत: खेळताना नाही तर तरुण क्रिकेटपटूंना क्रिकेटचे धडे देताना दिसणार आहे.
Jan 21, 2014, 04:01 PM ISTसचिनच्या साराची सामाजिक बांधिलकी!
सचिन तेंडुलकरची सासू आणि अपनालया या सामाजिक संस्थेद्वारे सामाजिक कार्य करणाऱ्या ऍनाबेल मेहता दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यात. सोबतच `मॅरेथॉनमध्ये यावर्षी पहिल्यांदाच भाग घेत असून एका सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मी धावणार आहे.` हे उद्गार आहेत सारा सचिन तेंडुलकर हिचे!
Jan 19, 2014, 09:33 AM ISTसचिनला भारत रत्न सन्मान ४ फेब्रुवारीला
भारतीय क्रिकेटचा तारा सचिन तेंडुलकर याला चार फेब्रुवारीला देशातील सर्वात मोठा सन्मान असलेल्या भारत रत्नाने सन्मानित करण्यात येणार आहे.
Jan 17, 2014, 03:58 PM ISTनिवृत्तीनंतरचं आयुष्य इतकंही वाईट नाही, सचिनचा कॅलिसला सल्ला
भारतीय क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेल्या सचिननं दोन दिवसांपूर्वी निवृत्त झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सच्चा चॅम्पियन’म्हणत ज्यानं नेहमी खेळाला खेळासारखाचा खेळलं, या शब्दात कॅलिसचं कौतुक केलंय.
Dec 31, 2013, 04:55 PM ISTइंग्लंडचा कॅप्टन ‘कूक’नं मोडला सचिनचा रेकॉर्ड
इंग्लंड क्रिकेट टीमचा कॅप्टन अॅलेस्टर कूक यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक रेकॉर्ड मोडलाय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सर्वात कमी वयात आठ हजार धावांचा टप्पा पार करण्याचा रेकॉर्ड कूकनं मोडीत काढला.
Dec 28, 2013, 11:06 PM ISTसचिन तेंडुलकरने पोस्टाला मिळवून दिले ६० लाख रुपये
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय टपाल विभागाला आपल्या जादुई नावाने ६० लाख रूपयांची कमाई करून दिली आहे. पोस्टाने सचिनचे पोस्ट तिकिट काढले होते. सचिनच्या तिकिटातून ६० लाख रूपये मिळालेत.
Dec 25, 2013, 04:13 PM ISTसचिन संघात नसल्याचं सत्य पचवावंच लागेल - धोनी
‘सचिनचं संघात नसणं सगल्या टीमला पचवावंच लागेल’ असा सल्ला टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं दिलाय.
Dec 18, 2013, 08:17 AM ISTटीम इंडिया आणि धोनीच्या मदतीसाठी धावला सचिन!
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वन-डे सीरिजमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. आता त्याची परतफेड टेस्ट सीरिजमध्ये करण्याचं आव्हान यंगिस्तानसमोर असणार आहे. तर दुसरीकडे १८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या टेस्टमध्ये आफ्रिकन बॅट्समन भारतीय बॉलिंगची पीसं काढण्यास उत्सुक असतील. त्यामुळंच कॅप्टन धोनीनं आता सचिनकडून बॉलिंगची तयारी करून घेतली आहे.
Dec 15, 2013, 05:52 PM IST