www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सचिन तेंडुलकरची सासू आणि अपनालया या सामाजिक संस्थेद्वारे सामाजिक कार्य करणाऱ्या ऍनाबेल मेहता दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यात. सोबतच `मॅरेथॉनमध्ये यावर्षी पहिल्यांदाच भाग घेत असून एका सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मी धावणार आहे.` हे उद्गार आहेत सारा सचिन तेंडुलकर हिचे!
अपनालय या गरीब अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी सारा या मॅरेथॉनमध्ये धावली असून या उपेक्षित घटकांच्या वेदनांकडे जास्तीत जास्त लोकांचे लक्ष जावं हा आपल्या `रन`मागील उद्देश असल्याचं तिनं सांगितलं. विशेष म्हणजे, मॅरेथॉनसाठी सचिननं साराला खास टिप्सही दिल्या आहेत.
`वडील हे माझे मित्र, गुरू, मार्गदर्शक असे सारे काही असून ते मला नेहमीच व्यायाम कसा करावा याचे योग्य धडे देतात`, असे ती पुढे म्हणाली.स्पर्धेत धावताना नेहमी सुरुवात धीम्यागतीनं करावी आणि हळूहळू वेग वाढवत नेत शेवटी वेगाने पुढे जाऊन अंतिम रेषा ओलांडावी, असं वडिलांनी सांगितल्याचे सारा म्हणाली. सारासोबत तिच्या दोन मैत्रिणी धावणार असून आम्ही एकाच उद्देशानं या स्पर्धेत भाग घेतला असल्याचे तिने सांगितले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.