सचिन तेंडुलकरला धोनीने ठोकला सॅल्युट

भारतरत्न पुरस्काराचा मानकरी ठरलेला पहिलाच खेळाडू सचिन तेंडुलकरला टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सॅल्युट ठोकलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 5, 2014, 04:32 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतरत्न पुरस्काराचा मानकरी ठरलेला पहिलाच खेळाडू सचिन तेंडुलकरला टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सॅल्युट ठोकलाय.
मास्टर ब्लास्टर सचिनला भारतरत्न पुरस्कार मिळाल्याने क्रीडा क्षेत्रात नवा आदर्श सचिनने निर्माण केलाय. याबद्दल माझा सचिनला मानाचा मुजरा. एखाद्या खेळाडूला पहिल्यांदा भारतरत्न पुरस्कार मिळला ही अतिशय आनंदादायी गोष्ट आहे.
सचिन सारखा महान खेळाडू पुन्हा होणे नाही, असे म्हणत सचिन देशाच्या युवा खेळाडूंच्या नेहमी आदर्श राहील, असे धोनीने म्हटले.
सचिन सारख्या विक्रमादित्य खेळाडूला भारतरत्न पुरस्कार देऊन योग्य सन्मान केला असल्याचेही धोनी म्हणाला.
देशाचा एक नागरिक म्हणून तुम्हाला मिळणारा हा सर्वात मोठा सन्मान आहे आणि तो योग्य व्यक्तीला मिळालाय. सचिन या पुरस्काराचा हक्काचा मानकरी होता, असेही धोनी म्हणाला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.