ब्रायन लाराचे रेकॉर्ड तोडत संगकाराचं त्रिशतक!

चटगाव इथं सुरु असलेल्‍या श्रीलंका विरुध्‍द बांगलादेश कसोटीमध्‍ये श्रीलंकेच्‍या कुमार संगकारानं त्रिशतक झळकावलंय. या ट्रिपल सेंच्युरीबरोबरच त्‍यानं तीन जागतिक रेकॉर्ड आपल्‍या नावावर केले आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Feb 6, 2014, 07:46 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, चटगाव
चटगाव इथं सुरु असलेल्‍या श्रीलंका विरुध्‍द बांगलादेश कसोटीमध्‍ये श्रीलंकेच्‍या कुमार संगकारानं त्रिशतक झळकावलंय. या ट्रिपल सेंच्युरीबरोबरच त्‍यानं तीन जागतिक रेकॉर्ड आपल्‍या नावावर केले आहेत.
संगकारानं विरेंद्र सेहवागपेक्षाही तुफान बॅटिंग करत आपलं त्रिशतक पूर्ण केलं. शाकिब अल हसनच्‍या ओव्हरमध्‍ये त्‍यानं सलग चार चौकार आणि दोन षटकार मारून ३०० रन्स पूर्ण केले.
संगकारानं ४८२ बॉल्समध्ये ३१९ रन्स केले. त्‍यामध्‍ये ३२ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश आहे. अखेर १५७व्या ओव्हरमध्ये नासिर हुसेनच्‍या बॉलिंगवर सोहाग गाझीनं त्‍याची कॅच घेत विकेट काढली. त्‍याच्‍या अप्रतिम खेळीमुळं श्रीलंकेनं ५८७ रन्सचा डोंगर उभा केला. या खेळातच संगकारा ११ हजार रन्स कराणारा ९वा बॅट्समन ठरलाय.
श्रीलंकेनं २४८ रन्सनी पहिला डाव जिंकल्‍यानंतर दुसऱ्या डावात टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला होता. संगकारानं त्रिशतक ठोकून ९ वर्षापूर्वीचे रेकॉर्ड तोडले.
संगकारानं मोडलेले रेकॉर्ड
> सर्वात वेगवान ११ हजार रन्स करणारा खेळाडू
> टेस्टमॅचमध्‍ये सर्वांत कमी डावांमध्‍ये ११ हजार धावा करणारा बॅट्समन, त्यानं केवळ २०८ टेस्टमध्ये हा रेकॉर्ड केलाय.
> टेस्टमध्‍ये सर्वाधिक २०० पेक्षा जास्‍त रन्स बनविणारा बॅट्समन
> कुमार संगकाराच्‍या करिअरमधील ही 9 डबल सेंच्युरी ठरली. टेस्टमध्ये 9 वे द्विशतक लगावणारा संगकारा पहिला फलंदाज ठरला आहे. तर जगामध्‍ये तिसरा फलंदाज ठरला आहे. त्‍याच्‍यापेक्षा जास्‍त शतके फक्‍त ऑस्‍ट्रेलियाच्‍या सर डॉन ब्रॅडमॅन यांनी लगावली आहेत.
> संगकारानं या द्विशतकाच्‍या बरोबरच दिग्‍गज फलंदाज ब्रायन लाराचे रेकॉर्डही तोडले आहे.
> विदेशी मैदानावर पहिलं त्रिशत झळकवणारा कुमार संगकारा पहिला श्रीलंकन बॅट्समन ठरलाय. तर जगातला १० वा खेळाडू ठरला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.