जनलोकपाल मंजूर करण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध – राहुल
लोकपाल बील शेवटच्या टप्प्यात असून बील मंजूर करण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध असल्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिलीये. लोकपाल विधेयक राज्यसभेच मंजूर होण्याची आशा असल्याची माहिती अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली. दिल्लीत पत्रकार परिषदेत काँग्रेसनं आपली भूमिका मांडली.
Dec 14, 2013, 08:37 PM ISTहा प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा मुद्दा आहे - राहुल गांधी
काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी यांनीही समलैंगिकतेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केलीय. ‘समलैंगिकतेबद्दल दिल्ली हायकोर्टानं दिलेला निर्णय अधिक योग्य होता’, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.
Dec 12, 2013, 06:11 PM ISTसोनिया गांधी ‘मदर इंडिया’ – सलमान खुर्शिद
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या केवळ राहुल गांधी यांच्या आई नसून संपूर्ण देशाची आई आहेत, असे वक्तव्य परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी आज करून पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे.
Dec 11, 2013, 06:50 PM ISTपंतप्रधानपदाचा उमेदवार पक्ष ठरवेल- सोनिया
विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात. तरीही चार राज्यांमधील निकाल म्हणजे आमच्यासाठी जनतेने दिलेल्या सूचनाच आहेत. पराभवामुळे निराश नक्कीच आहोत; पण हा निकाल आम्ही स्वीकारत आहोत, अशा शब्दात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पराभव स्वीकारला आहे.
Dec 8, 2013, 07:09 PM ISTएक्झिट पोलवर काँग्रेसला नाही विश्वास
एक्झिट पोलच्या माध्यामातून येणारे निष्कर्ष बिनकामाचे असतात, अशा शब्दांत काँग्रेसने हे निष्कर्ष फेटाळून लावले आहेत, तर आलेल्या निष्कर्षामुळे भाजपला पाचपैकी चार राज्यात स्पष्ट बहुमत मिळणार असं दिसत असल्याने काँग्रेस निरुत्साही झाला असल्याची टीका भाजपने केली आहे.
Dec 6, 2013, 10:32 AM ISTकाँग्रेसकडून शिवसेना टार्गेट, मनसेला झुकते माप?
काँग्रेस विरूद्ध नरेंद्र मोदी असे राजकीय रंग भरले असतानाच आता काँग्रेसने शिवसेनेला टार्गेट करण्याचं धोरण अबलंबिले दिसून येत आहे. शिवसेना टार्गेट करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सॉफ्ट कॉर्नर दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे.
Nov 19, 2013, 01:29 PM ISTभ्रष्टाचारात भाजप वर्ल्ड चॅम्पियन - राहुल गांधी
काँग्रेसचे युवा नेते आणि उपाध्यक्ष राहुल गांधींनी छत्तीसगढ सरकारवर कडाडून टीका केलीय. छत्तीसगढ सरकार भ्रष्टाचाराचे वर्ल्ड चॅम्पियन असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय.
Nov 9, 2013, 12:03 AM ISTराहुल गांधीनी निवडणूक आयोगाला दिलं उत्तर
ISIच्या मुद्यावरून अडचणीत आलेल्या राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या नोटीशीला उत्तर दिलंय. मी आचार संहितेचे मी उल्लंघन केलेले नाही. माझ्यासमोर जे तथ्य आले ते मी बोललो.
Nov 8, 2013, 06:42 PM ISTसामनामध्ये युवराजांचं कौतुक, मोदींना टोला!
राहुल गांधींनी इंदूरच्या सभेत मुजफ्फरनगर संदर्भात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य योग्यच आहे, असा चिमटा शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतलाय. त्याबरोबरच या विधानाला विरोध करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अन्य भाजप नेत्यांनाही टोलेबाजी करण्यात आलीये.
Oct 28, 2013, 12:58 PM ISTट्विटर युद्ध: ‘मोदींपेक्षा सुषमा चांगल्या तर राहुल पेक्षा दिग्विजय’
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधानपदाच्या उमेदवारावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलंच ट्विटर युद्ध रंगलंय. नरेंद्र मोदींना अहंकारी, मनोरुग्ण आणि खोटारडे म्हणत काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी ट्विटर युद्धाला सुरूवात केली. भाजपामध्ये नरेंद्र मोदींपेक्षा सुषमा स्वराज या चांगल्या पंतप्रधान होतील असं दिग्विजय सिंह म्हणाले. तर यावर उत्तर देत सुषमा स्वराज यांनी राहुल गांधींपेक्षा दिग्विजय चांगले उमेदवार असं म्हटलंय.
Oct 28, 2013, 08:19 AM ISTनिवडणूक सभांचा आज सुपर संडे!
५ राज्यातील निवडणुकांची धामधूम सुरु झालीय. त्याच पार्श्वभूमीवर आज निवडणूक सभांचा सुपर संडे रंगणार आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी सामना पाहायला मिळणार आहे.
Oct 27, 2013, 11:29 AM ISTराहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीला आयएसआयची मदत असल्याचं वक्यव्य काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी केलं होतं. त्याविरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. तसेच समाजवादी पक्षानेही राहुल गांधींवर जातीयवादी असल्याची टीका केलीय.
Oct 26, 2013, 07:41 AM ISTहत्येला मी घाबरत नाही, भाजप जातीय दंगल घडवतं - राहुल
राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केलाय. भाजप मतांसाठी जातीय दंगली घडवत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. आपल्या आजी आणि बाबांची हत्या करण्यात आली त्यामुळं आपल्यालाही जिवंत ठेवणार नसल्याचं वक्तव्य केलं. मात्र आपण घाबरत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
Oct 23, 2013, 02:43 PM ISTमाझ्या आईने अश्रू ढाळलेत अन्नसुरक्षेसाठी – राहुल गांधी
देशाच्या जवळ ७० टक्के लोकसंख्येस अतिस्वस्त दरात अन्नपुरवठा करण्याची ग्वाही देणारे अन्नसुरक्षा विधेयक संसदेमध्ये संमत झाले, त्यावेळी प्रकृती ठीक नसल्याने गैरहजर असलेल्या माझ्या आईला दु:खावेग आवरता न आल्याने तिने अश्रूच्या सहाय्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या, असे ` काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मध्य प्रदेशातील एका सभेत बोलताना सांगितले.
Oct 17, 2013, 06:34 PM ISTराहुल गांधी X नरेंद्र मोदी सामना, विरोधकांना धूळ चारू - राहुल
गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या विरोधकांना २०१४ मध्येही धूळ चारू असा निर्धार काँग्रेसचे उपाध्य़क्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, येत्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी - नरेंद्र मोदी सामना होण्याचे संकेत दोन्ही पक्षांकडून देण्यात आले आहेत.
Oct 8, 2013, 02:10 PM IST