www.24taas.com ,वृत्तसंस्था, शाहदोल
देशाच्या जवळ ७० टक्के लोकसंख्येस अतिस्वस्त दरात अन्नपुरवठा करण्याची ग्वाही देणारे अन्नसुरक्षा विधेयक संसदेमध्ये संमत झाले, त्यावेळी प्रकृती ठीक नसल्याने गैरहजर असलेल्या माझ्या आईला दु:खावेग आवरता न आल्याने तिने अश्रूच्या सहाय्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या, असे ` काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मध्य प्रदेशातील एका सभेत बोलताना सांगितले.
संसदेमध्ये अन्नसुरक्षा विधेयकावरील चर्चेस सोनिया गांधी उपस्थित होत्या; मात्र मतदानाच्या वेळी त्या उपस्थित राहु शकल्या नव्हत्या. संसदेमध्ये अन्न सुरक्षा विधेयक संमत होण्याच्या काही वेळ आधी त्यांना बरे वाटत नसल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राहुल गांधींनी याविषयी आज सांगितले की, सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसतानाही, हे विधेयक मंजूर व्हावे यासाठी त्या हजर राहिल्या होत्या.
‘माझ्या आईची प्रकृती ठीक नसतानाही ती संसदेमध्ये उपस्थित होती. अखेर तिला मी रुग्णालयात नेले. आम्ही रुग्णालयात गेलो तोपर्यंत तिला नीट श्वापसही घेता येत नव्हता. मात्र ‘या विधेयकाकरता मी संघर्ष केला आणि आता मला या विधेयकावर मतदान करता येत नाही,` यामुळे तिला खूप दु:ख होऊन तिच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले होते ` असे राहुल यांनी सांगितले.
मध्य प्रदेशामधील ग्वाल्हेर येथे बोलताना गांधी यांनी यावेळी राज्यातील भाजप सरकारवरही सडकून टीका केली. तसेच भाजपचा या कायद्यास विरोध करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधी यांनी बोलतांना सांगितले की, मध्य प्रदेशामध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वयभूमीवर युवा सरकार निर्माण करण्यावर काँग्रेसचा भर असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४
तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.