कॅन्सरवर घरगुती उपाचाराचा दावा करणारे सिद्धू एकटे नाहीत! परदेशातही अशी उदाहरणे…

नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पत्नीने स्टेज 4 कॅन्सरवर आयुर्वेदिक उपायांच्या मदतीने मात केल्याचा दावा केला आहे. अशाच पद्धतीचा दावा परदेशातही करण्यात आला आहे. यामध्ये प्रतिबंधित वनस्पती, वनौषधीचा सहभाग असल्याच सांगण्यात येते. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 29, 2024, 03:15 PM IST
कॅन्सरवर घरगुती उपाचाराचा दावा करणारे सिद्धू एकटे नाहीत! परदेशातही अशी उदाहरणे… title=

कॅन्सरमुक्त होण्यावर नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेल्या वक्तव्य सध्या चर्चेत आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नोनी यांना स्टेज 4 कॅन्सर झाला होता. यावेळी त्यांची 5 टक्के जगण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. यावेळी नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल आयुर्वेदीक उपचार आणि डाएट फॉलो केल्याच सांगितलं. यामुळे अवघ्या 40 दिवसांमध्ये कॅन्सरवर मात केल्याच सांगितल आहे. 

या सगळ्या प्रकरणामुळे कॅन्सरवर अशा आयुर्वेदिक किंवा प्रतिबंधित वनस्पती, वनौषधी उपायांनी मात करता येते का असा प्रश्न उभा राहिला आहे. यापूर्वीही अनेक व्यक्तींनी अशा पद्धतीने कॅन्सरवर मात केल्याच सांगितलं होतं. 

एका आईने आपल्या किशोरवयीन मुलाला कॅन्सरमुक्त केल्याचा रिपोर्ट 2017 मध्ये www.independent.co.uk मध्ये सादर करण्यात आला होता. कॅली ब्लॅकवेल या आईने आपला मुलगा डेरिन याला दुर्मिळ स्वरुपाच्या ल्युकेमिया या कॅन्सरपासून मुक्त केले आहे. यासाठी तिने आपल्या मुलाला मारिजुआना या गांजाचे औषध म्हणून वापर केला.  

तो रोज मृत्यूशी लढत होता आणखी काय होणार 

ब्लॅकवेल या आईला या उपचाराबद्दल विचारण्यात आलं तेव्हाचे तिचे हे शब्द. मी विचार आणखी वाईट काय होईल, असाही तो रोज थोडा थोडा मरत होता. मारिजुआनाचा वापर करण्यापूर्वी त्यांनी केलेला हा विचार नक्कीच स्तब्ध करणारा आहे. ब्लॅकवेल यांनी सांगितले की, 14 वर्षांचा त्यांचा मुलगा डेरयन हा 10 वर्षांचा असल्यापासून अनेक किमोथेरपी आणि रेडिओथेरपीमधून जात होता. हे इतकं सहन करणाऱ्या मुलासोबत आणखी काय वाईट होऊ शकतं असा सवाल ब्लॅकवेल यांनी विचारला. 

मारिजुआनाचा या मुलासाठी औषध म्हणून वापर करण्यात आला. या गांजामुळे शरीरातील मानसिक आणि शारीरिक पेशींमधील तणाव दूर होण्यास मदत होते. तसेच याचे सेवन नियमित स्वरुपात केल्यावर एखाद्या रोगावापसून रिकव्हरी होण्यास मदत होते. यामध्ये एँटीइंफ्लेमेटरी गुण असल्यामुळे मदत होत असल्याचं सांगण्यात येते. 

पण याबाबत कोणताही वैद्यकीय रिपोर्ट किंवा अहवाल उपलब्ध नाही. त्यामुळे आयुर्वेदिक उपचार किंवा वनौस्पतींबाबत कोणताही ठाम पुरावा नाही. त्यामुळे हा उपाय किती योग्य आहे. याबाबत संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे अशा पद्धतीच्या उपचारांचा झी चोवीस तास पाठपुरवठा करत नाही. येथे फक्त यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.