www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी यांनीही समलैंगिकतेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केलीय. ‘समलैंगिकतेबद्दल दिल्ली हायकोर्टानं दिलेला निर्णय अधिक योग्य होता’, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकारांसी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘सुप्रीम कोर्टापेक्षा आपण दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयावर जास्त सहमत आहोत’ असं म्हटलंय.
‘माझं वैयक्तिक मत विचाराल, तर हा मुद्दा प्रत्येकाच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा हा मुद्दा आहे. मला वाटतं, मी दिल्ली हायकोर्टानं अगोदर दिलेल्या निर्णयाशीच जास्त सहमत आहे’, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. ‘प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र अशी आवड-निवड असते... आणि आपला देश हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ओळखळा जातो’, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय.
‘समलिंगी संबंध हा फौजदारी गुन्हा ठरवणारी कायद्यातील तरतूद मुलभूत हक्कांवर गदा आणणारी आहे. १८ वर्षांवरील प्रौढ व्यक्ती परस्पर संमतीनं समलिंगी संबंध ठेवू शकतात आणि ते कायदेशीर असतील’, असा निकाल दिल्ली कोर्टानं दिला. मात्र, त्याचवेळी संमतीशिवाय आणि अल्पवयीन मुलामुलींवर लादण्यात येणारे लैंगिक संबंध मात्र गुन्हाच असतील, असंही कोर्टानं स्पष्ट केलं होतं. उच्च न्यायालयाचा हाच निर्णय बुधवारी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावत या निर्णयाच्या अगदी विरुद्ध, ‘समलैंगिक संबंधाना कायदेशीर मान्यता देता येणारा नाही... समलैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहे’, असा निर्णय दिला.
त्यानंतर, देशभरात सर्वोच्च न्यायालयाच्या यानिर्णयासोबत आणि या निर्णयाविरुद्ध अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयात सुधारणाकरण्यासाठी आयपीसी ‘कलम ३७७’वर चर्चा करण्याचं आश्वासन दिलंय. सोनिया गांधी आणि कायदेमंत्री कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निराशाजनक असल्याचंही म्हटलंय. त्यानंतर राहुल गांधींनीही सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर आपला आक्षेप व्यक्त केलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.