WWE मधील भारतातील पहिला रेसलर द ग्रेट खली आहे. खलीने रिंगमध्ये मोठ्या सुपरस्टार्सवर शानदार पद्धतीने वर्चस्व गाजवले आहे. त्याने सुरुवातीपासूनच व्यावसायिक कुस्तीत भारताचे नाव उंचावले आहे. खलीने 2 जानेवारी 2006 रोजी WWE मध्ये पदार्पण केले. प्रथमच द ग्रेट खलीने स्मॅकडाउनमध्ये प्रवेश करताना अंडरटेकरवर हल्ला केला. खलीने आपल्या कुस्ती कारकिर्दीत अनेक मोठे यश संपादन केले आहे. 2007 मध्ये तो पहिला भारतीय वर्ल्ड चॅम्पियन बनला, ज्यामुळे प्रेक्षकांना खूप आनंद झाला.
खलीने नुकतंच 'द लालनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांची उत्तर दिली आहेत. त्यातील एक म्हणजे WWE मध्ये एका सामन्यासाठी किती पैसे मिळतात? त्यावर त्याने उत्तर दिलं की, " प्रत्येकाची किंमत वेगेवेगळी असते. मी रेसलमेनिया जिंकलं होत. तेव्हा मला त्याचे ७ लाख डॉलर मिळाले होते. मला मेसेज आला. मला तो मेसेज समजला नाही. मी माझ्या मित्राला विचारलं हे काय आहे. तेव्हा त्याने सांगितलं की ७ लाख डॉलर दिली आहेत तुला. तेव्हा मी पूर्ण पीकवर होते आणि तेव्हा मला एका सामन्याचे ७ लाख डॉलर मिळाले होते."
"रेसलमेनियावाले चेक द्यायचे. एका सामन्याचे दिले होते. तर एकदा चेक वर किती पैसे आहेत ते समजलंच नाही. मला वाटलं ७००० आहे कि ७०० रुपयांचा चेक आहे. तेव्हा मित्राने सांगितलं की ७ लाख डॉलर आहे."
खलीने चार हॉलिवूड चित्रपट, दोन बॉलीवूड चित्रपट आणि अनेक टेलिव्हिजन शोमध्येही काम केले आहे. खली ऑक्टोबर 2010 ते जानेवारी 2011 या काळात टेलिव्हिजन रिॲलिटी शो बिग बॉसमध्ये देखील दिसला, ज्यामध्ये त्याची प्रथम उपविजेता म्हणून निवड झाली. बिग बॉसने खलीसाठी खास व्यवस्था केली, ज्यात त्याला बसण्यासाठी सानुकूल बेडचा समावेश आहे.