president

लोकसभा अध्यक्षपदी सुमित्रा महाजन, कोकणात आनंदोत्सव

लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या ज्येष्ठ खासदार सुमित्रा महाजन यांचं नाव निश्चित झालंय. त्यांच्या निवडीनं कोकणातील रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. कारण एका चिपळूणकर कन्येला लोकसभा अध्यक्षपदी बसण्याचा बहुमान प्रथमच प्राप्त होणार आहे. चिपळुणात लहानाची मोठी झालेली ही मराठी मुलगी लोकशाहीतील या मानही चिपळूणची सर्वोच्च मुलगी मोठ्या स्थानावर विराजमान होत आहे.

Jun 5, 2014, 07:50 PM IST

नड्डा होणार भाजपचे नवे अध्यक्ष?

भाजपसाठी नवीन अध्यक्षाचा शोध सुरु झालाय. मोदींच्या कॅबिनेटमध्ये विद्यमान भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी हालचाली सुरु झाल्यात.

May 25, 2014, 11:00 AM IST

ओबामा जेव्हा रस्त्यावर फिरतात तेव्हा...

जगाची महाशक्ती असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा रस्त्यावर फिरतात... मॉलमध्ये जातात.... लोकांच्या गाठी भेटी घेतात. हे सांगितल्यावर तुम्हांला खोटं वाटेल... पण हे खरं आहे. हा व्हिडिओ पाहा त्यात ओबामा चक्क रस्त्यावर फिरताना आणि आपल्या जनतेशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत.

May 23, 2014, 12:31 PM IST

याकूब मेमनच्या फाशीवर राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब!

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब अब्दुल रजाक मेमन याची दया याचिका फेटाळून लावलीय.

May 22, 2014, 08:23 AM IST

मोदींचा सत्ता स्थापनेचा दावा, 26 मे रोजी शपथ

नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. भेटीत नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे.

May 20, 2014, 03:44 PM IST

राष्ट्रपतींना भेटून मोदी करणार सत्ता स्थापनेचा दावा

केंद्रात लवकरच मोदी सरकारची स्थापना होणार आहे. भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दुपारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.

May 20, 2014, 10:42 AM IST

`बीसीसीआय`वर मोदी संकट; `आरसीए`लाच केलं निलंबित

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)चे माजी आयुक्त ललित मोदी यांना आज सकाळी राजस्थान क्रिकेट संघाचा (आरसीए) नवीन अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर बीसीसीआयचे धाबे दणाणलेत

May 6, 2014, 12:37 PM IST

`आरसीए`च्या अध्यक्षपदी ललित मोदींची निवड

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मंगळवारी चांगलाच झटका बसलाय. राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या (आरसीए) अध्यक्षपदी निवड झालीय.

May 6, 2014, 11:07 AM IST

श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टाचा दणका

बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टानं चांगलाच दणका दिला आहे. स्पॉट फिक्सिंगप्रकरणाचा नि:पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी श्रीनीवासन यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे. त्यांनी अजून राजीनामा का दिला नाही, असा सवाल करत सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला फटकारलं आहे.

Mar 25, 2014, 12:20 PM IST

भर सभेतच राष्ट्राध्यक्षांनी पॅन्ट केली ओली!

कोलंबियाचे राष्ट्रपती जुआन मॅन्युअल सॅन्टोस यांनी निवडणुक सभेतील एका भाषणादरम्यान स्टेजवरच आपली पॅन्ट ओली केली.

Mar 19, 2014, 03:39 PM IST

'अमिताभ यांनी देशाचं राष्ट्रपतीपद भूषवलं पाहिजे'

महानायक अमिताभ बच्चन यांनी देशाचं राष्ट्रपतीपद भूषवलं पाहिजे, असं नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत म्हटलं आहे.

Jan 16, 2014, 05:03 PM IST

सावकारी विरोधी कायदा लागू, राष्ट्रपतींची मसुद्यावर स्वाक्षरी

गरीब शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी राज्य सरकारनं मंजूर केलेल्या कायद्याला अखेर राष्ट्रपतींनीही मंजुरी दिली आहे. २०१० मध्ये राज्य विधिमंडळाने हा कायदा संमत करून मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला होता. मात्र केंद्र सरकारने त्यात काही सुधारणा सुचवल्या होत्या. त्या सुधारणा करून पुन्हा सुधारित कायदा केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. आज राष्ट्रपतींनी सावकारी विरोधी कायद्याच्या मसुद्यावर स्वाक्षरी करून त्याला मंजुरी दिली.

Jan 10, 2014, 11:20 PM IST

अमेरिकेच्या फेडरल बँकेची `दोरी` पहिल्यांदा महिलेच्या `हाती`

अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हची सूत्र शंभर वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा एका महिलेच्या हाती येणार आहेत, अमेरिकेच्या सिनेटने जेनेट येलेन यांची फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखपदी निवड झाल्याचं स्पष्ट केलं आहे.

Jan 7, 2014, 12:14 PM IST

सुशीबेन शहा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा

अखेर राज्य महिला आयोगाला अध्यक्षा मिळाल्या आहेत. गेल्या साडे चार वर्षांपासून रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी सुशीबेन शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Dec 31, 2013, 08:14 PM IST

अविवाहित मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी...

बिहारच्या एका गावच्या पंचायतीनं संपूर्ण गावातल्या अविवाहीत मुलींसाठी एक नवीन फतवा काढलाय. या फतव्यानुसार, गावातील अविवाहीत मुलींना मोबाईल वापरण्यासाठी बंदी घालण्यात आलीय.

Dec 26, 2013, 03:38 PM IST