mumbai

मुंबईकरांना 'स्टिंग रे', 'जेलीफीश'चा धोका, समुद्र किनारी 'अशी' घ्या काळजी

Beware Stingray:'स्टींग रे’चा दंश झाल्यास, अशा दंशामुळे नागरिकांना दंशाच्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशचा संसर्ग झाल्यास त्यांच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाका. जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही याची खबरदारी घ्या.

Aug 20, 2023, 01:03 PM IST

पावसाचा ब्रेक! मुंबईकरांची चिंता कायम, कोणताही तलाव ओव्हरफ्लो नाही... पाहा काय आहे स्थिती

मुंबईला पाणीपुरवठा करणारा कोणताही प्रमुख तलाव सध्या 'ओव्हरफ्लो' नाही, असं मुंबई  महापालिकेने स्पष्ट केलं आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाणही कमी झाल्याने चिंता वाढली आहे.  समाज माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीला धरून नसल्याचा महानगरपालिका प्रशासनाने खुलासा केला आहे. 

Aug 19, 2023, 02:57 PM IST
Mumbai Drop In Tomato Price Heading To More Price Drops PT55S

Mumbai | गगनाला भिडलेले टोमॅटोचे भाव अखेर उतरले

Mumbai Drop In Tomato Price Heading To More Price Drops

Aug 19, 2023, 09:10 AM IST

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबईकडे जाणाऱ्या 'या' एक्स्प्रेस रद्द, लोकल सेवाही बंद

Pune News : मुंबईकडे ट्रेनने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रविवारी 20 ऑगस्ट रोजी काही तांत्रिक कामामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

Aug 19, 2023, 09:03 AM IST

MU Senet Election:आदित्य ठाकरेंनी मुंबई विद्यापीठाला विचारले 'हे' 5 प्रश्न

MU Senet Election: मुंबई विद्यापीठावर अशी कोणती आणीबाणीची परिस्थिती आली होती की, रात्री उशिरा विशेष व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीद्वारे रात्री 11.30 वा परिपत्रक जारी करून निवडणुका थांबवाव्या लागल्या? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

Aug 18, 2023, 04:52 PM IST

सिनेट निवडणुकीवरून राजकारण! विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरत आहे? मनसे आक्रमक

Senate Election : सिनेट निवडणुक स्थगितकेल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे नेते  आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री आणि भाजपवर टीका केली आहेत तर आता मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणूक विद्यापीठाने स्थगित करणं अत्यंत धक्कादायक आणि अशोभनीय असल्याचं पत्रच मनसेने राज्यपालांना लिहिलंय.

 

Aug 18, 2023, 02:08 PM IST

राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक, आदित्य ठाकरेंचा घणाघात

MU Senate Election: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक आहेत. ते घाबरले म्हणून त्यांनी भाजापमध्ये उडी मारली. नाहीतर, त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली असती" असं बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Aug 18, 2023, 01:50 PM IST

एमबीए करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; अखेर मुंबईलाही मिळालं IIM

IIM Mumbai : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (सुधारणा) विधेयक 2023 ला लोकसभा आणि राज्यसभेतून मंजुरी मिळाल्यानंतर आता राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था (NITIE) अधिकृतपणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई म्हणून ओळखली जाणार आहे.

Aug 18, 2023, 08:26 AM IST

Video : 5 मिनिटं उशीर झाला तरी चालेल पण असा जीवघेणा प्रवास नको, Mumbai Local चा ट्रेंडिंग व्हिडीओ पाहिला का?

Mumbai Local Video : मुंबई लोकल प्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो ट्रेंडिंगमध्ये आहे. तरुणाचा जीवघेणा प्रवास पाहून हृदयाचे ठोके चुकतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Aug 17, 2023, 05:50 PM IST

संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक

ED Arrest Sujit Patkar: कोविड घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक केली आहे. दरम्यान, न्यायालयात हजर केलं असता त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. 

 

Aug 17, 2023, 05:26 PM IST

पंकज त्रिपाठी यांना आवडतं मराठमोळं ठसकेबाज जेवण; पुढ्यात ताट येताच मारतात ताव

Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांना कोणता महाराष्ट्रीन पदार्थ आवडतो याविषयी सांगितलं आहे. 

Aug 17, 2023, 04:27 PM IST
Man falls on Railway tracks after being punched during argument at Mumbai Sion station gets crushed by local train PT1M54S