Video : 5 मिनिटं उशीर झाला तरी चालेल पण असा जीवघेणा प्रवास नको, Mumbai Local चा ट्रेंडिंग व्हिडीओ पाहिला का?

Mumbai Local Video : मुंबई लोकल प्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो ट्रेंडिंगमध्ये आहे. तरुणाचा जीवघेणा प्रवास पाहून हृदयाचे ठोके चुकतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नेहा चौधरी | Updated: Aug 17, 2023, 05:50 PM IST
Video : 5 मिनिटं उशीर झाला तरी चालेल पण असा जीवघेणा प्रवास नको, Mumbai Local चा ट्रेंडिंग व्हिडीओ पाहिला का? title=
woman hanging on moving mumbai local train scares internet trending viral video watch now

Mumbai Local Viral Video : खरं तर सोशल मीडियावर मुंबईतील अनेक व्हिडीओ सेकंद सेकंदाला व्हायरल होतं असतात. मुंबईतील पावसातील व्हिडीओ असो किंवा रोमान्स करणाऱ्या कपलचे व्हिडीओ असो. मुंबईतील लोकल ट्रेनमधील तर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. लोकल ट्रेनमधील महिलांच्या मारामारीपासून गाण्यारे तरुण गाणं असो किंवा भजन मंडळी अगदी या महिला डब्ब्यातील कसही सेलिब्रेशन असो. 

मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. तिच्या शिवाय जगणं मुंबईकर विचारही करु शकतं नाही. घर, ऑफिसनंतर त्यांचं अजून एक दुनिया असं ते म्हणजे ही लोकल ट्रेन...पण या लोकल ट्रेनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. लोकलमधून प्रवास करणं तसं सोप नाही. खचाखच भरलेल्या ट्रेनमधून प्रवास करणे हे मुंबईकरांसाठी नवीन नाही. (woman hanging on moving mumbai local train scares internet trending viral video watch now )

एक लोकल सुटली की पुढच्या ट्रेनने आपलं ठिकाण गाठायचं..पण हे एवढं सोपं नाही कारण एक ठरलेली लोकल सुटली की पुढचे ठरलेली कामं उशीरा होणार. ऑफिस, कॉलेजला उशीर होणार आणि मग लेट मार्क लागणार. म्हणून कितीही गर्दी असली तरी लोकल पकडायची आणि प्रवास करायचा. 

सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी कसा प्रवास करतेय हे दिसतंय. तरुणीचा हा प्रवास म्हणजे अगदी जीवाशी खेळ आहे. एक चुक म्हणजे यमराज घर...तुम्ही या पाहू शकता ती तरुणी लोकलच्या दरवाज्याला लटकून अगदी काठावर लगबग तिचे पाय आहेत. खरं तर ती अर्धापेक्षा जास्त हवेतच आहे. पाय सरकला किंवा हात सुटला किंवा कोणाचा धक्का लागला तर ती धावत्या लोकल मधून खाली पडू शकते. 

अशा प्रकारच्या अनेक घटना मुंबई ऐकायला मिळतात. या व्हिडीओवर खास करुन लिहिण्यात आलं आहे की, पाच मिनिट उशीर झाला तरी चालेल पण असा जीवावर बेतणारा प्रवास करू नये.

हा व्हिडीओ इन्स्टाग्राम आणि ट्वीटरवर व्हायरल होतो आहे. ट्वीटरवर Dr MJ Augustine Vinod  या अकाऊंटवर तो शेअर करण्यात आला आहे.