monsoon session

विरोधकांनी पिटल्या टाळ, भजन करून आंदोलन

सलग तिसऱ्या दिवशीही विधानभवनाबाहेर पायऱ्यांवर बसून विरोधकांचं आंदोलन सुरूच आहे. विधीमंडळात आजही कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतलाय. 

Jul 15, 2015, 12:04 PM IST

विधिमंडळ अधिवेशनाला वादळी सुरुवात, सरकारला पकडले कोंडीत

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात झालीय. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन करत सरकारला पहिल्याच दिवशी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.

Jul 13, 2015, 01:00 PM IST

राज्य विधिमंडळ अधिवेशन आजपासून, विरोधक आक्रमक

राज्य विधिमंडळ अधिवेशनला आजपासून सुरुवात होत आहे. यात शेतकऱ्यांच्या समस्यांवरुन, विरोधक सरकारवर प्रश्नांचा भडीमार करणार आहेत. आता या अधिवेशनात तरी सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, इतकीच माफक अपेक्षा जाणकार व्यक्त करत आहेत. 

Jul 13, 2015, 09:27 AM IST

८० करोड लोकांना स्वस्त धान्य?

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. युपीए सरकारनं काल संसदेत मांडलेल्या अन्न सुरक्षा विधेयकावर आज चर्चा होण्याची शक्यताय. अन्न सुरक्षा अध्यादेश मंजूर झाल्यास देशातील ८० करोड लोकांना स्वस्तात धान्य मिळू शकेल.

Aug 6, 2013, 09:13 AM IST

आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होतेय. उत्तर प्रदेशच्या आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांच्या निलंबनाचे पडसाद आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.

Aug 5, 2013, 09:41 AM IST

...आणि सोनिया गांधी भडकल्या

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संतापाचा पारा आज लोकसभेत पाहायला मिळाला. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी अडवाणी यांनी 'यूपीए -2 सरकार अवैध' असल्याचे म्हटले आणि शांत वाटणाऱ्या सोनिया गांधी यांनी आपला वृद्रावतार दाखवला. काँग्रेसने प्रती हल्लाबोल केल्यानंतर अडवाणी यांनी आपले वक्तव्य मागे घेतले.

Aug 9, 2012, 01:48 AM IST

लोकसभेचे कामकाज स्थगित

संसदेचे आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले. मात्र, काही मिनिटातच ते स्थगित करण्यात आले आहे. या अधिवेशनात आसाममधील हिंसाचाराचे पडसाद उमटले.

Aug 8, 2012, 11:42 PM IST