पावसाळी अधिवेशन: हरसूल दंगलप्रकरणी विरोधकांचा विधानसभेत सभात्याग

 पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. विरोधकांनी हरसूल दंगलप्रकरणी विधानसभेत सभात्याग केलाय. 

Updated: Jul 17, 2015, 01:14 PM IST
पावसाळी अधिवेशन: हरसूल दंगलप्रकरणी विरोधकांचा विधानसभेत सभात्याग title=

दीपक भातुसे/अमित जोशी, झी मीडिया, मुंबई:  पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. विरोधकांनी हरसूल दंगलप्रकरणी विधानसभेत सभात्याग केलाय. 

सरकार दंगल हाताळण्यास अपयशी ठरल्याचा विरोधकांचा आरोप असून हरसूल दंगलीवर विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला. आमदार जीव पांडू गावित यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. 

दरम्यान, स्थगन प्रस्ताव फेटाळत सरकारनं निवेदन करावे, असे अध्यक्षांचे निर्देश दिले आहेत. सरकार पुढील आठवड्यात निवेदन देणार असल्याची माहिती सरकारनं दिलीय.  

मात्र सरकारनं तातडीने निवेदन करावे अशी मागणी करत विरोधकांनी  सभात्याग केला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.