विरोधकांनी पिटल्या टाळ, भजन करून आंदोलन

सलग तिसऱ्या दिवशीही विधानभवनाबाहेर पायऱ्यांवर बसून विरोधकांचं आंदोलन सुरूच आहे. विधीमंडळात आजही कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतलाय. 

Updated: Jul 15, 2015, 10:35 PM IST
 विरोधकांनी पिटल्या टाळ, भजन करून आंदोलन title=

ज्ञानबा तुकाराम, सरकारचं काय काम - विरोधकांचं भजन

दुपारी १२.३० वाजता -

विरोधकांनी आज हाती टाळ घेऊन विधानभवन परिसरात भजन गात सरकारचा निषेध केला. सलग तीन दिवसांपासून विरोधक आक्रमक होत विविध प्रकारचं आंदोलन करत आहेत. पहिल्या दिवशी चिक्की घोटाळ्याची कविता... दुसऱ्या दिवशी चिक्की खाऊन आमदाराचं बेशुद्ध होणं आणि आज भजन... विरोधक चांगलेच आक्रमक दिसत आहेत. 

नदीला आला पूर, पाणी लागलं वडाला, नरेंद्र म्हणाला देवेंद्रला, आपलं सरकार बुडाला, ज्ञानबा तुकाराम, सरकारचं काय काम, असं उपरोधिक भजन विरोधकांनी विधानभवन परिसरात गायलं.

विधानभवनात सरकारनं माध्यमांना रोखलं, विरोधकांचा आक्षेप, देशाची आणीबाणीकडे वाटचाल, अजित पवारांचं टीकास्त्र

अजित पवार -
- विधानभवनात माध्यमांना वृतांकन करण्यापासून अटकाव करणं निषेधार्ह असून या संदर्भात विधानसभा अध्यक्षांची चर्चा करणार.
- RBI ही सरकारच्या अधिपत्याखाली काम करत आहे. मनमानी कारभार सुरु.
- उद्धव ठाकरे यांनी ही कर्जमाफीची मागणी केली आहे आणि शिवसेना आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता.
- आम्ही कधी मारून मुटकून एकतर्फी कामकाज केलं नाही. महत्वाचे विधेयक आमच्याशी चर्चा न करता मंजूर करने हे चुकीचे. यासाठी दररोज सकाळी संसदीय कामकाज मंत्री सर्वपक्षिय गट नेत्यांची बैठक व्हावी.

सुनील तटकरे - विधानपरिषद 

- मुख्यमंत्री यांची विश्वासहर्ता पणाला लागली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी घरी जातात आणि त्यानंतर तिथं आत्महत्या होतात. 
- कर्जमाफी जोपर्यंत जाहिर करत नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही

अजित पवार - 
- विधिमंडळाच्या वतीने पत्रक काढून पायऱ्यांवरील आंदोलन कव्हर करण्यास पायबंद, ही माध्यमांच्या मुस्कटदाबी 
- आडवाणी म्हणतात आणाबाणी येऊ शकते त्याची प्रचिती येत आहे
- विधानपरिषद कामकाज एक तासाकरता तहकूब
- याविरोधात विरोधक अध्यक्ष आणि सभापतींना भेटणार

अबू असीम, आझमी, सपा नेते- 

- याकूब मेमनच्या फाशीची तारीख लीक होणं ही सरकारची मार्केटिंग
- कसाब, अफज़ल गुरुच्या फाशीची तारीख कधीच समजली नव्हती मग याकूबची फाशीची तारीख कशी काय लिक झाली.
- सरकारचा सांप्रदायिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न.
- याकूबची क्यूरेटिव पेटिशन अजूनही सुप्रीम कोर्टात विचाराधीन. 
- सरकारचा जनतेच्या मूळ विषयांना बगल देण्याचा प्रयत्न

अमित जोशी/दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: सलग तिसऱ्या दिवशीही विधानभवनाबाहेर पायऱ्यांवर बसून विरोधकांचं आंदोलन सुरूच आहे. विधीमंडळात आजही कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतलाय. 

राज्यात दुष्काळाचं सावट असल्यानं सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून लावून धरलीय. काल अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी याविषयी सभात्याग केल्यावर विधानसभेचं कामाकाज विरोधकांशिवाय पुढे नेण्याचा सरकारनं निर्णय घेतला. आजही विरोधक  आक्रमक झालेत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज निती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीत असल्यानं ते मुंबईत उशीरा येणार आहेत. त्यामुळं मुख्यमंत्री नाहीत तर चर्चा कुणासोबत करणार अशी भूमिका विरोधी पक्षानं घेतलीय.  

विरोधकांच्या गदारोळामुळे सुरूवातीलाच १० मिनीटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.