मुंबई ते नागपूर एक्सप्रेस हायवे सहापदरी : मुख्यमंत्री

मुंबई ते नागपूर एक्सप्रेस हायवे सहा पदरी बांधण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. हा महामार्ग ८०० किमीचा असणार असून ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Updated: Jul 31, 2015, 09:41 PM IST
मुंबई ते नागपूर एक्सप्रेस हायवे सहापदरी : मुख्यमंत्री title=

मुंबई : मुंबई ते नागपूर एक्सप्रेस हायवे सहा पदरी बांधण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. हा महामार्ग ८०० किमीचा असणार असून ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या सहाय्याने मुंबई ते नागपूर सहापदरी महामार्ग बांधणार येणार आहे. महामार्गासाठी ३० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असून महामार्गाचे काम २०१९ पर्यंत पूर्ण होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

मुंबई ते नागपूर प्रवास केवळ १० तासात होईल. केंद्राबरोबर भागिदारी करून हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. तसेच नागपूर - अमरावती -जळगाव - औरंगाबाद - मुंबई हा मार्ग २०१९ पर्यंत पूर्ण करणार असल्याचे ते म्हणालेत. मुंबई - नागपूर या महामार्गावर टोल असणार का? हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.