आम्ही काय झक मारायला आलो का? आमदार प्रशांत बंब भडकले

शेतकऱ्यांना संपू्र्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशी मागणी करत चार दिवस विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांवर भाजपाचे आमदार प्रशांत बंब चांगलेच भडकले. त्यांनी सभागृहात आम्ही इथं काय झक मारायला आलो आहोत का? असा प्रश्न विचारत आपल्या संतापाला वाट करून दिली. 

Updated: Jul 16, 2015, 04:39 PM IST
आम्ही काय झक मारायला आलो का? आमदार प्रशांत बंब भडकले title=

मुंबई: शेतकऱ्यांना संपू्र्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशी मागणी करत चार दिवस विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांवर भाजपाचे आमदार प्रशांत बंब चांगलेच भडकले. त्यांनी सभागृहात आम्ही इथं काय झक मारायला आलो आहोत का? असा प्रश्न विचारत आपल्या संतापाला वाट करून दिली. 

अधिवेशनावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांचे भत्ते कापावेत अशी मागणी त्यांनी अध्यक्षांकडे केली. तसंच त्यांच्यावर कडक कारवाई करावी असंही बंब म्हणाले.

विरोधक सभागृहात आले तर चर्चा होईल ना, त्यासाठी त्यांनी आधी इथं यायला हवं, असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर नक्की बोलतील असं बंब यांनी सांगितलं.

अर्थात सलग चौथ्या दिवशी काँग्रेसनं विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता तरी राष्ट्रवादीचे आमदार सभागृहात आले, त्यामुळं विरोधकांमध्ये फूट पडल्याची चर्चा होती. नंतर काँग्रेसचे आमदारही कामकाजात सहभागी झाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.