विधिमंडळ अधिवेशनाला वादळी सुरुवात, सरकारला पकडले कोंडीत

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात झालीय. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन करत सरकारला पहिल्याच दिवशी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.

Updated: Jul 13, 2015, 01:20 PM IST
विधिमंडळ अधिवेशनाला वादळी सुरुवात, सरकारला पकडले कोंडीत title=

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात झालीय. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन करत सरकारला पहिल्याच दिवशी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्रित हे आंदोलन केलं. पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. अच्छे दिन आहेत कुठे अशा घोषणा देत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला.

अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी केली. चिक्की घोटाळ्याप्रकरणी पंकजा मुंडेंविरोधात तर माहिती लपवल्याप्रकरणी बबनराव लोणीकरांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्यात. यावेळी विरोधकांची कविता...

पंकजा पंकजा
Yes pappa 
ईटिंग चिक्की 
Yes pappa
विनोद विनोद 
Yes pappa
बोगस डिग्री
Yes pappa
लोनिकर लोनिकर 
Yes pappa
दोन दोन बायका
Hahahahahaha

विरोधकांनी अशा घोषणा देत अधि्वेशनाच्या सुरूवातीलाच विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. सरकारला अनेक मुद्यावरून घेरलंय. 

शेतक-यांना कर्जमाफी न दिल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. अच्छे दिन आहेत कुठे अशा घोषणा देत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. दरम्यान, शेतकऱ्यांना कर्ज माफीच्या मुद्द्यावरून रणकंदन होणार हे कालच स्पष्ट झालं होतं. कारण मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी देणार नाही हे चहापानानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. त्यावर आज विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटलांनी जोरदार टीकास्त्र सोडलं

दरम्यान, धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांची गांधीगिरी. पावसाळी अधिवेषणाच्या पहिल्या दिवशी विधान भवना मध्ये जाणाऱ्या सत्ताधारी सेना भाजपच्या आमदारांना गुलाबाचे फुल देत ST आरक्षणाच्या अंमलबजावणीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची केली मागणी.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.