पतंजली बिस्किटांमध्ये सापडला मैदा, गुन्हा दाखल
पतंजलीच्या विविध प्रॉडक्टची सध्या भारतीयांमध्ये खूप क्रेज निर्माण झाली आहे. पतंजलीवर लोकांचा विश्वास वाढला आहे. अशातच पतंजलीसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. पतंजली मैदा विरहित बिस्किटे असल्याची जाहीरात करीत असताना त्यात मैदा आढळून आल्याने पतंजली उद्योगाचे प्रमुख रामदेव बाबा यांच्याविरोधात राजस्थानात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Feb 2, 2018, 07:35 PM ISTचहलने केली कमेंट, तर रोहितची पत्नी रितिकाने दिले हे जबरदस्त उत्तर
भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा नेहमी टीमच्या युवा क्रिकेटरची चांगली खेचत असतो. पण आता तो विचित्र परिस्थिती अडकला आहे. रोहितने पोस्ट केलेल्या एका फोटोवर स्पिनर युजवेंद्र चहल याने रोहितची पत्नी रितिकावर एक कमेंट केली. पण रितिकानेही त्याचे शानदार उत्तर दिले. त्यानंतर फॅन्सच्या कमेंटचा पूर आला.
Feb 2, 2018, 06:24 PM IST१९ वर्षीय तरूणीवर सिनेमा थिएटरमध्ये बलात्कार
गेल्या सोमवारी हैदराबाद येथील एका सिनेमागृहात एका १९ वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेची दखल घेत पोलिसांनी आरोपीला पकडले असून सिनेमागृहाच्या मालकाविरूद्ध कारवाई केली आहे.
Feb 2, 2018, 04:36 PM ISTviral video :गलिच्छ बिळांची सफर केल्यानंतर साबणाने अंघोळ करणारा उंदीर
गेल्या आठवड्यात चहा पिणारी एक पाल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता या आठवड्यात एक साबणाने अंघोळ करणारा उंदीर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jan 29, 2018, 04:55 PM ISTज्यू धर्मियांची मराठी संस्कृती!
भारत आणि इस्त्रायल यांच्यात मैत्रीचे संबंध दृढ होत आहे. मात्र हे संबंध दृढ होण्याआधीपासून गेली कित्येक वर्षे भारतीय समाजाचा भाग बनून ज्यू धर्मीय राहिले आहेत. ठाणे आणि ज्यू यांचं नातं तर खुपच जुनं... या नात्याला नवी झळाळी लाभलीय ती इस्त्रायलच्या तांत्रिक टीमने तयार केलेल्या 'डीजी ठाणे' या अॅप्लीकेशनमुळे... भारत आणि इस्त्रायलला एकमेकांच्या मैत्रीत जखडून ठेवणारा हा हळूवार बंध सांगणारा हा विशेष रिपोर्ट...
Jan 27, 2018, 10:34 AM ISTविरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला, भाजपचे तिरंगा रॅलीने उत्तर
संविधान धोक्यात असल्याचा आरोप करत संविधान बचाव रॅलीच्या बॅनरखाली देशभरातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. उद्या प्रजासत्तादिनी सर्व विरोधी पक्ष मिळून मुंबईत संविधान बचाव रॅली काढणार आहेत. १५ दिवसांपूर्वी विरोधकांनी या रॅलीची घोषणा केल्यानंतर भाजपानेही या रॅलीला उत्तर देण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन केलं आहे. उद्या मुंबईत या दोन्ही रॅलीने राजकीय वातावरण मात्र तापणार आहे.
Jan 25, 2018, 11:04 PM ISTअफगाणिस्तानने रचला इतिहास, पहिल्यांदा अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये
फिरकी गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने यजमान न्यूझीलंडला गुरूवारी २०२ धावांनी पराभूत केले. या शानदार आणि ऐतिहासिक विजयामुळे अफगाणिस्तान अंडर १९ वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये पोहचला आहे.
Jan 25, 2018, 09:17 PM ISTधोनी आफ्रिकेसाठी रवाना, सोबत दिग्गज क्रिकेटरची मुलं..
टेस्ट सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया आता आपल्या सर्वात यशस्वी कर्णधाराची आठवण काढत आहे. हो आम्ही बोलतोय महेंद्रसिंग धोनीबद्दल.
Jan 25, 2018, 07:56 PM ISTफ्रान्समध्ये चूक करण्याचा अधिकार
दगडी चाळ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल त्यातील चुकीला माफी नाही... हा डायलॉग खूप फेमस झाला होता. पण एक असा देश आहे, त्यात चुकीला माफी मिळणार आहे. या देशाने कायदा करून चुकीला माफी देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे.
Jan 25, 2018, 07:04 PM ISTआत्महत्येचा व्हिडिओ बनवून त्रास देणाऱ्या प्रियकराला पाठवला...
भंडारा जिल्ह्यातील एका मुलीचा साखरापुडा दुसऱ्या मुलाशी झाला असला तरीही तिचा जुना प्रियकर तिला त्रास देत असल्यामुळे एका २१ वर्षीय तरुणीने विष प्राशन केले असल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली.
Jan 24, 2018, 11:37 PM ISTराज्यात या शहरात प्रदर्शित होणार नाही 'पद्मावत'
देशभरात वादग्रस्त ठरलेल्या पद्मावत सिनेमाबाबत एक धक्कादायक बातमी आहे. करणी सेनेने केलेल्या निकराच्या विरोधामुळे देशातील चार प्रमुख राज्यांमध्ये पद्मावत प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात पंढरपुरातही हा चित्रपट प्रदर्शीत करण्यात येणार नाही आहे.
Jan 24, 2018, 09:34 PM ISTअसे ४ चित्रपट ज्यात खतरनाक खलनायकापुढे किरकोळ दिसला 'हिरो'
बॉलीवूडमध्ये मेन लीड हा कायम हिरो असतो. पण डारेक्टर सर्वात जास्त रिसर्च या गोष्टीचा करतो की व्हिलन कोण असणार... अनेक असे चित्रपट आहेत की ते व्हिलनला पाहून बनविले गेले आहेत.
Jan 24, 2018, 09:12 PM IST७ महिन्यांच्या बाळाने गिळलेला एलईडी बल्ब, डॉक्टरांनी काढला २ मिनिटांत
चिपळूणमध्ये राहणाऱ्या ७ महिन्याच्या अरिबाने खेळता खेळता चुकून एलईडी बल्ब गिळला. पालकांना वाटले की तिने, दोरा किंवा मोबाईलची पिन गळली असावी. त्यानंतर तिला सतत खोकला आणि ताप येऊ लागला. त्यामुळे पालक तिला स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन गेले, पण परिस्थितीत काहीही बदल झाला नाही. तिच्या उजव्या बाजूच्या फुफ्फुसामध्ये बाह्यघटक असल्याचे तिच्या एक्स-रेमध्ये आढळून आले.
Jan 24, 2018, 08:00 PM ISTशेताच्या बांधावर जाऊन अजितदादांची हुरडा पार्टी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेत केवळ सभांच्या माध्यमातून नव्हे तर विविध माध्यमातून नेते शेतक-यांशी संवाद साधत असून आज तर शेतक-यांच्या बांधावर जाऊन हुरडा खात संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून जात आहे.
Jan 24, 2018, 02:58 PM ISTहरमनप्रीत कौरकडे भारतीय संघाची धुरा, महाराष्ट्राची स्मृती मानधना उपकर्णधार
आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी-२० मालिकेत भारतीय महिला संघाची अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरकडे भारतीय महिला संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे.
Jan 23, 2018, 10:08 PM IST