मुंबई : टेस्ट सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया आता आपल्या सर्वात यशस्वी कर्णधाराची आठवण काढत आहे. हो आम्ही बोलतोय महेंद्रसिंग धोनीबद्दल.
दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाला पराभवाचे तोंड पाहावे लागले तेव्हा सुनील गावस्कर यांनी महेंद्रसिंग धोनी याची आठवण काढली होती. धोनी असता तर इतक्या वाईट पद्धती भारताला पराभव पत्करावा लागला नसता. त्यांनी धोनी पुन्हा निवृत्तीबाबत पुनर्विचार करण्याचा सल्ला देऊन टाकला होता. पण सध्या धोनी हा भारताच्या वन डे आणि टी -२० संघाचा हिस्सा आहे.
एक फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात ६ सामन्यांची वन डे सिरीज होणार आहे. धोनी वन डे संघाचा एक भाग आहे. त्यामुळे तो आता टीम इंडियाला जॉइन करणार आहे. वन डे टीमच्या खेळाडूंना २४ तारखेला आफ्रिकेला रवाना व्हायचे होते. पण खेळाडून २५ तारखेला रवाना झाले आहेत.
महेंद्रसिंग धोनी दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी रोड्स यांच्या कुटुंबासोबत एकाच विमानातून रवाना झाला आहे. यावेळी धोनीने जॉन्टीच्या मुलांसोबत फोटो काढले. आणि जॉन्टीने ट्विटर खात्यावर शेअर केले आहेत. यावेळी जॉन्टीने धोनीची स्तुती करत लिहिले की, माझे मुलं सध्या सुरक्षित हातांमध्ये आहेत. धोनी जगात यावेळी सर्वश्रेष्ठ विकेटकिपर आहे.
There are always feelings of concern when family leaves after 2 incredible months together, but I need not have feared; as they were in safe hands @msdhoni getting some advice from India and Nathan Jon on how to play in SA - he told them “mujhe pata hai” #SAvIND dhanyavaad Mahi pic.twitter.com/8wurojjCF3
— Jonty Rhodes (@JontyRhodes8) January 25, 2018
त्यामुळे टीम इंडियाने जेव्हापासून दक्षिण आफ्रिकेत पराभवाचे तोंड पाहिले आहे तेव्हापासून त्यांना धोनीची गरज वाटत आहे.
धोनीसोबत वनडे संघात सामील होण्यासाठी जोहान्सबर्गला इतर खेळाडूही रवाना झाले आहेत. त्यात युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, केदार जाधव, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, कुलदीप यादव यांचा समावेश आहे.