असे ४ चित्रपट ज्यात खतरनाक खलनायकापुढे किरकोळ दिसला 'हिरो'

  बॉलीवूडमध्ये मेन लीड हा कायम हिरो असतो. पण डारेक्टर सर्वात जास्त रिसर्च या गोष्टीचा करतो की व्हिलन कोण असणार... अनेक असे चित्रपट आहेत की ते व्हिलनला पाहून बनविले गेले आहेत.  

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 24, 2018, 09:12 PM IST
असे ४ चित्रपट ज्यात खतरनाक खलनायकापुढे किरकोळ दिसला 'हिरो'  title=

मुंबई :  बॉलीवूडमध्ये मेन लीड हा कायम हिरो असतो. पण डारेक्टर सर्वात जास्त रिसर्च या गोष्टीचा करतो की व्हिलन कोण असणार... अनेक असे चित्रपट आहेत की ते व्हिलनला पाहून बनविले गेले आहेत.  

सध्या बॉलीवूडमध्ये पद्मावत चित्रपटाचा वाद चर्चिला जात आहे. त्यात यात रणवीर सिंग याने साकारलेला अलाउद्दीन खिलजीची सर्वाधिक चर्चा होत आहे. महाराजा रत्न रावल सिंह यांच्या भूमिकेत शाहिद कपूर आहे, पण त्या पेक्षा रणवीर उजवा वाटत आहे. 

बॉलीवूडमध्ये असे चार चित्रपट झाले आहेत त्यात खलनायकापुढे हिरो खूपच दयनीय दिसला आहे. 

Image result for padmavat zeenews

१) पद्मावत :

  खिलजी (रणवीर सिंह) पद्मावतमध्ये व्हिलन आहे, चुकीचे कामं करतो, पण तो चांगले विचार ठेवणारा फौलादी राजा रत्न सिंह रावल ( शाहिद कपूर ) पेक्षा अधिक प्रभावी वाटत आहे. पद्मावत मध्ये खिलजीचे चरित्र प्रमाणापेक्षा जास्त क्रूर दाखविण्यात आले आहे. तो अत्यंत भयावह वाटत आहे. 

 

Image result for daar shaharukh zeenews
२) डर : 

१९९३ मध्ये आलेल्या 'डर' या चित्रपटात सनी देओल हिरो आहे तर सेकंड लीडमध्ये शाहरूख खान आहे. शाहरूख निगेटीव्ह कॅरेक्टरमध्ये दाखवला गेला आहे.  या शाहरूखने एका सनकी आशिकची भूमिका केली आहे. हा चित्रपट हिट झाला आणि शाहरूख खान सुपर हीट झाला. शाहरूखला या चित्रपटासाठी बेस्ट व्हिलनचा पुरस्कार मिळाला होता. 

ashotosh rana

३) संघर्ष : 

१९९९ मध्ये रिलीज झालेला चित्रपट संघर्षच्या लीड रोलमध्ये अक्षय कुमार आणि प्रिती झिंटा होती. पण हा चित्रपट आशुतोष राणा याच्यामुळे खूप हीट झाला. यात आशुतोषने एक भयावह व्हिलन साकारला होता. यामुळे प्रेक्षकांच्या मनात भय निर्माण झाले होते. त्याची ही भूमिका अनेक वर्षांपासून आठवणीत राहिली आहे. 

Image result for agnipath sanjay dutt zeenews

४) अग्नीपथ :

२०१२ मध्ये आलेल्या संजय दत्त आणि हृतिक रोशन यांचा अग्नीपथ असा एक चित्रपट.. ज्यात व्हिलन खूप दमदार दाखविण्यात आला आहे. हा चित्रपट अग्निपथ या १९९० मधील अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचा रिमेक होता.  कांचा चिना ही भूमिका संजय दत्तने साकारली होती. यात हृतिक रोशन लीड रोलमध्ये होता पण दबदबा हा संजय दत्तचा म्हणजे कांचा चिनाचा जाणावला.