आत्महत्येचा व्हिडिओ बनवून त्रास देणाऱ्या प्रियकराला पाठवला...

भंडारा जिल्ह्यातील एका मुलीचा साखरापुडा दुसऱ्या मुलाशी झाला असला तरीही तिचा जुना प्रियकर तिला त्रास देत असल्यामुळे एका २१ वर्षीय तरुणीने विष प्राशन  केले असल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली.

Updated: Jan 25, 2018, 05:51 PM IST
आत्महत्येचा व्हिडिओ बनवून त्रास देणाऱ्या प्रियकराला पाठवला... title=

माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा : साखरपुडा पार पडल्यानंतरही जुना प्रियकरच्या त्रासाला कंटाळून भंडारा जिल्ह्यातील एका २१ वर्षीय तरुणीनं विष प्राशन करून आपलं जीवन संपवले.

धक्कादायक म्हणजे, तरुणीनं आपल्या आत्महत्येचा व्हिडिओ बनवत तो आपल्या जुन्या प्रियकराला पाठवला. या तरुणीचं नाव निशा कावळे असं होतं. विष घेतल्यानंतर जेव्हा कुटुंबियांच्या ही गोष्ट लक्षात आली, तेव्हा त्यांनी तिला हॉस्पीटलमध्ये हलवलं... परंतु, शरीरात विष परसल्यानं या घटनेत निशाचा मृत्यू झाला.

निशाच्या आत्महत्येप्रकरणी तिचा जुना प्रियकर निखिल बोरकर हा दोषी असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाखांदूर तालुक्यातील रोहणी या गावात राहणाऱ्या निशाने आत्महत्येचा व्हिडिओ बनवत तो तिच्या मैत्रिणी तसेच जुन्या प्रियकराला पाठवला होता. तिच्या मृत्यूनंतर तिचा मोबाईल तपासला असता त्यात हा व्हिडिओ केले असल्याची माहिती समोर आली. 

निशा हिचे लग्न जुळण्याआधी तिचे निखिल बोरकरसोबत प्रेमसंबंध होते. मात्र निखिल हा लग्नाविषयी केवळ टाळाटाळ करीत होता. त्यामुळे निशानं कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. ३१ डिसेंबरला तिचा साखरपुडाही पार पडला.

येत्या ४ फेब्रुवारीला लग्नदेखील लाखांदूर येथे होणार होते. मात्र काल सायंकाळच्या सुमारास लाखांदूर येथून आल्यानंतर निशाने स्वतःच्या खोलीत जात विष प्राशन करीत त्याचा व्हिडिओदेखील बनविला. तो निखिल तसेच इतर मैत्रिणीला पाठविला सकाळी निशा न उठल्यामुळे कुटुंबीयांनी पाहिलं तेव्हा तिने विष प्राशन केल्याचं त्यांच्या लक्षात आलं.