OIL India Recruitment 2024: चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. ऑइल इंडिया लिमिटेड (OIL India Limited) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
ऑइल इंडियामध्ये कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्रोजेक्टमधील डोमेन स्पेशलिस्टच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तुम्हीही या पदांसाठी अर्ज करत असाल तर सर्वप्रथम खाली दिलेले सर्व महत्त्वाचे मुद्दे काळजीपूर्वक वाचा. ऑइल इंडिया भर्ती 2024 डोमेन स्पेशलिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पर्यावरण अभियांत्रिकी किंवा पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
ऑइल इंडियाच्या डोमेन स्पेशलिस्ट या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 70 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
सर्व आवश्यक कागदपत्रांवर सेल्फ अटेस्ट करा आणि अर्ज ईमेलद्वारे domainexpert_bd_cbg@oilindia.in वर पाठवा. अधिकृत वेबसाइट oil-india.com वर याचा सविस्तर तपशील पाहता येणार आहे. अर्जामध्ये दिलेली माहिती बरोबर आणि परिपूर्ण असावी. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले किंवा अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद घ्या.
मुंबई मेट्रोमध्ये अंतर्गत सहाय्यक महाव्यवस्थापक, उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंता ही पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी मुंबई मेट्रोच्या अधिकृत वेबसाइट mmrcl.com वर 27 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सहाय्यक महाव्यवस्थापक (सिव्हिल) चे 1, उपअभियंता (स्थापत्य) ची 5 पदे, कनिष्ठ अभियंता-II (स्थापत्य) चे 1 पद अशी एकूण 7 पदे भरली जाणार आहेत. मुंबई मेट्रोमधील सहाय्यक महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्णवेळ सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी असणे आवश्यक आहे. तर ज्युनिअर असिस्टंटसाठी पूर्णवेळ सिव्हिल इंजिनिअर पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे. याशिवाय पदानुसार अनुभव असणेही महत्त्वाचे आहे. अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. उमेदवारांचे कमाल वय 35 वर्षे असावे. उमेदवारांच्या वयाची गणना 1 नोव्हेंबर 2024 रोजी केली जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे. ही भरती कंत्राटी आणि प्रतिनियुक्तीवर केली जात आहे. ज्यामध्ये उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय थेट वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. 28 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर ॲप्लिकेशन विंडोची लिंक बंद होईल. उमेदवारांनी या रिक्त पदासाठी वेळेत अर्ज करावेत.