कसा ढासळला पुण्यातला काँग्रेसचा बालेकिल्ला?
मतदानापूर्वी आणि मतदानानंतरही चुरशीची वाटलेली पुण्यातील लढत प्रत्यक्षात एकतर्फी ठरली. भाजपच्या अनिल शिरोळेनी काँग्रेसच्या विश्वजीत कदमांचा दारूण पराभव केला. संपूर्ण महाराष्ट्रासाठी लक्षवेधी ठरलेल्या पुण्याच्या निकालाचं विश्लेषण करणारा विशेष रिपोर्ट
May 19, 2014, 09:07 AM ISTमहाराष्ट्राची जबाबदारी अमित शहांवर येण्याचे संकेत
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदींचं लक्ष आता महाराष्ट्र विधानसभेवर असणार आहे. याच कारणाने भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
May 18, 2014, 12:14 PM ISTयापुढेही भारताची प्रगती होत राहो - मनमोहन सिंग
काँग्रेस सरकारच्या काळात आम्ही चांगले काम केले. गेल्या दहा वर्षांमध्ये आम्ही जे प्रगतीचे टप्पे पार केले आहेत, यापुढेही अशीच भारताची प्रगती होत राहो, अशी आशा भारताचे मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली.
May 17, 2014, 12:47 PM ISTमोदींच्या `विजय` यात्रेस दिल्लीत सुुरुवात
विजयानंतर सबका साथ, सबका विकास, असा नवा नारा देत देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बडोद्यात जोशपूर्ण आणि भावपूर्ण भाषण केलं. सुरुवातीलाच त्यांनी बडोद्याच्या जनतेचे आभार मानले. आजपासून चांगले दिवस सुरू झालेत. देशातल्या जनतेसाठी शरीरातला कण न् कण आणि क्षण अन् क्षण वेचणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशा विश्वास त्यांनी देशातल्या जनतेला दिला. आज नवी दिल्लीत भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजधानी दिल्लीत दाखल झाले असून, विमानतळापासून त्यांच्या `विजय`यात्रेस सुरुवात झाली आहे.
May 17, 2014, 12:32 PM IST`महायुतीला राज्यात ३४ जागा मिळतील`
महायुतीला राज्यात ३४ पेक्षा जास्त जागा मिळतील, असं भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच आपण भाजप कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे आदेशही दिले असल्याचं मुंडेंनी म्हटलंय.
May 14, 2014, 04:35 PM ISTलोकसभा 2014 : पाहा एबीपी न्यूज आणि नील्सनचा सर्वे
लोकसभेच्या मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर, वाहिन्यांवर एक्झिट पोल्स आणि सर्वेचे वारे वाहू लागले आहेत.
May 12, 2014, 09:39 PM ISTपाहा प्रमुख राज्यांविषयी वाहिन्यांचे अंदाज
लोकसभेच्या मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर, वाहिन्यांवर एक्झिट पोल्स आणि सर्वेचे वारे वाहू लागले आहेत.
May 12, 2014, 09:19 PM ISTपाहा राजधानीत कुणाला किती जागा?
दिल्लीत कुणाचा दबदबा असेल हे पाहणे महत्वाचे आहे, कारण आपने दिल्लीत या आधी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
May 12, 2014, 08:44 PM ISTलोकसभेच्या इतिहासात`विक्रमी मतदान`
भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त दिवस चाललेल्या मतदान प्रक्रियेचा शेवट झाला आहे. लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी हे मतदान पार पडलं आहे.
May 12, 2014, 08:08 PM ISTपाहा उत्तर प्रदेशात कोण `बाहुबली`?
उत्तर प्रदेशात सर्वाधिक जागा भाजपला मिळणार असल्याचं चित्र आहे?
May 12, 2014, 07:48 PM ISTपाहा पश्चिम बंगालमध्ये कुणाला किती जागा मिळतील?
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं एक्झिट पोलमधून दिसून येत आहे.
May 12, 2014, 07:25 PM ISTपाहा बिहारमध्ये कुणाला सर्वात जास्त जागा?
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातली निवडणूक संपल्यानंतर, टेलव्हिजनवर एक्झिट पोलचे वारे वाहू लागले आहेत. एबीपी-नील्सन सर्वेने बिहार आणि उत्तर प्रदेशात एनडीएला मोठं बहुमत मिळणार असल्याचं म्हटलं आहे.
May 12, 2014, 07:06 PM IST...तर राजकारणातून संन्यास घेईल- मोदी
कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बात्रा आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल मला आदर आहे. हुतात्मा झालेल्या जवानांचा अपमान करण्यापेक्षा राजकारणातून संन्यास घेईल, असे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्हटले आहे.
Apr 30, 2014, 01:22 PM ISTया सेलिब्रेटींनीही मतदानाचा हक्क बजाविला
मतदान करा, फरक पडतो, असं आवाहन करणाऱ्या सेलिब्रेटींनीही आज आपला मतदानाचा हक्क बजाविला. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांच्यासह अनेक कलाकार, उद्योगपती अनिल अंबानी यांनी आज सकाळीच मतदान केले.
Apr 24, 2014, 12:08 PM ISTराज्यातलं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान संपलं, टक्केवारी वाढली
देशात आज पाचव्या टप्प्याचं तर राज्यातलं दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपलं आहे. राज्यात सरासरी पाचपर्यंत 54 टक्के मतदान झालं आहे. या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढलीय.
Apr 17, 2014, 06:21 PM IST