लोकसभेच्या इतिहासात`विक्रमी मतदान`

भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त दिवस चाललेल्या मतदान प्रक्रियेचा शेवट झाला आहे. लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी हे मतदान पार पडलं आहे.

Updated: May 12, 2014, 08:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
निवडणूक आयोगाने प्राथमिक स्वरूपात दिलेल्या माहितीनुसार, देशातील 66 टक्के लोकांनी सोळाव्या लोकसभेसाठी मतदान केलं आहे. हे विक्रमी मतदान आहे.
कारण मागील निवडणुकीत म्हणजे 2009 साली 58 टक्के मतदान झालं होतं, तर 1984 साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत 64 टक्के मतदान झालं होतं.
लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी आज मतदान पार पडलं आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीत किती लोकांनी मतदान केलं हा शेवटचा आकडा मंगळवारी स्पष्ट होणार आहे.
सोमवारी शेवटचा टप्पा, तीन राज्यात पार पडला, यात बिहार सहा, उत्तर प्रदेश 18 आणि पश्चिम बंगालमधील 17 जागांचा समावेश आहे.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये 79.3 टक्के मतदान झालं आहे, तसेच बिहारमध्ये 58 टक्के, आणि उत्तर प्रदेशात 55 टक्के लोकांनी मतदान केलंय.
सर्वांची नजर उत्तर प्रदेशावर असणार आहे, कारण उत्तर प्रदेशातून 80 खासदार निवडले जाणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.