latest marathi news

मुंबई-गोवा महामार्गावर विचित्र अपघात, दोघांचा मृत्यू ५ गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर एक विचित्र अपघात झाला आहे. चार वाहनांमध्ये हा अपघात झाला असून या अपघातात २ जणांचा मृत्यू झालाय तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सुकेळी खिंडीजवळ हा अपघात झाला आहे.

Jun 1, 2018, 11:37 AM IST

रुग्णाच्या नातेवाईकांकडून वोक्हार्ट हॉस्पिटलची तोडफोड

मीरा रोडमधील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये हृदयविकारानं मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. मात्र, पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत तोडफोड केली. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Jun 1, 2018, 10:06 AM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

भाजपाला शिवसेनेसोबत युती हवी आहे, मात्र युती एकतर्फी होऊ शकत नाही. त्यामुळे याबाबत निर्णय शिवसेनेनं घ्यायचा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

Jun 1, 2018, 09:37 AM IST

साई भक्तांच्या बसला अपघात, दोघांचा मृत्यू

जामखेड खर्डा रोडवरील शिऊर फटा येथे ट्रक आणि हैदराबाद येथील साई भक्तांना घेऊन जाणाऱ्या लग्झरी बसचा पहाटे ४ वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण जखमी असल्याचं समजतय.

Jun 1, 2018, 09:08 AM IST

ऐतिहासिक शेतकरी संपाची आज वर्षपूर्ती, शेतकऱ्यांना काय मिळालं?

अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांब्यात गेल्या वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन केलं होतं. त्या ऐतिहासिक संपाला आज एक वर्ष पूर्ण झालं.

Jun 1, 2018, 08:44 AM IST

घरगुती गॅस सिलिंडर महागला

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असतानाच आता सर्वसामान्य नागरिकांना आणखीन एक झटका बसला आहे. कारण, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

Jun 1, 2018, 08:28 AM IST

यवतमाळमध्ये भीषण अपघात, १० भाविकांचा मृत्यू

यवतमाळच्या कोसदनी घाटात भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात १० भाविकांना आपला जीव गमवावा लागलाय. ट्रक आणि कारची नागपूर तुळजापूर मार्गावर समोरासमोर धडक झाली.

Jun 1, 2018, 07:38 AM IST

Airtel चा नवा दमदार रिचार्ज प्लान, मिळणार 140 GB डेटा

एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक जबरदस्त रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे. 449 रुपयांच्या या प्लानच्या माध्यमातुन एअरटेल आपल्या प्रतिस्पर्धी रिलायन्स जिओच्या 448 रुपयांच्या प्लानला टक्कर देणार आहे. पाहूयात एअरटेलने लॉन्च केलेल्या 449 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना काय सुविधा मिळणार आहेत.

May 31, 2018, 02:57 PM IST

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय स्टेट बँकेने आपल्या बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे.

May 31, 2018, 02:03 PM IST

पालघर पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित विजयी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 31, 2018, 02:02 PM IST

Airtel चा जबरदस्त प्लान, 299 रुपयांत मिळवा अनलिमिटेड कॉल्स

एअरटेलने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी एक नवा आणि धमाकेदार प्लान लॉन्च केला आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉल्स आणि मेसेजेसची सुविधा मिळणार आहे.

May 31, 2018, 01:16 PM IST

महाराष्ट्र राज्याच्या गुप्तवार्ता विभागात भरती, असा करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, महाराष्ट्र राज्याच्या गुप्तवार्ता विभागात भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होऊन तुम्हीही गुप्त वार्ता विभागात नोकरी मिळवू शकता. एक नजर टाकूयात या संपूर्ण भरती प्रक्रियेवर...

May 31, 2018, 12:34 PM IST

15000 रुपयांच्या आत बजेट असलेले बेस्ट सेल्फी स्मार्टफोन

भारतीय बाजारात स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे 15,000 रुपयांपर्यंत किंमत असलेले फोन मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. एक नजर टाकूयात 5 स्मार्टफोन्सवर ज्यांची किंमत 15000 रुपयांपेक्षा कमी आहे.

May 31, 2018, 11:42 AM IST

भारतीय सैन्याच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीर आणि सीमा भागात दहशतवाद्यांचे हल्ले सुरुच असल्याचं दिसत आहे. बुधवारी रात्री भारतीय सैन्याच्या गस्तीपथकावर दहशतवाद्यांनी हल्ला अचानक हल्ला केला. या हल्ल्याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

May 31, 2018, 10:55 AM IST

या टिप्स वापरत स्मार्टफोन करा आणखीन 'जबरदस्त'

बाजारात सध्या अँड्राईड स्मार्टफोन्सचा दबदबा असल्याचं पहायला मिळत आहे. तुम्हीही स्मार्टफोन युजर्स आहात तर तुम्हाला काही टिप्स जाणून घेणं गरजेचं आहे जेणेकरुन तुमचा स्मार्टफोन चांगला राहील.

May 31, 2018, 10:20 AM IST