Kareena Kapoor Instagram Post : बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सैफ अली खानवर 15 जानेवारी मध्यरात्री चाकू हल्ला करण्यात आला. एका अज्ञात व्यक्तीने घरात घुसून सैफ अली खानवर हल्ला केला आहे. 16 जानेवारीचा संपूर्ण दिवस पटौदी कुटुंबासाठी कठीण होता. सैफवरील 6 वार आणि त्याची शस्त्रक्रिया या सगळ्यात हा दिवस केला. यानंतर संध्याकाळी करीना कपूरने आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन एक पोस्ट केली.
करीना कपूरने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, हा संपूर्ण दिवस कुटुंबासाठी कसा होता हे या पोस्टमध्ये मांडल आहे. तसेच तिने चाहते आणि पापाराझी यांना एक विनंती देखील केली आहे.
करीना कपूरने या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये लिहिलं आहे की, आमच्या कुटुंबासाठी हा संपूर्ण दिवस अतिशय कठीण आणि आव्हानात्मक होता. आताही आम्ही या सगळ्या प्रक्रियेतून जात आहोत. म्हणजे तसा प्रयत्न करत आहोत. हे कसं झालं? या प्रश्नाचाच विचार डोक्यात येत आहे. हा कठीण काळ आहे. मी मीडिया आणि पापाराझी यांनी विनंती करते त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत. तसेच आमच्या खासगी जीवनाचा आदार करुन थोडा काळ आमच्या कुटुंबाला एकटं सोडावं.
शेवटी, करीनाने लिहिले, 'कृपया आम्हाला थोडी वेळ द्या जेणेकरून आमचे कुटुंब यातून बाहेर पडू शकेल आणि या सर्व गोष्टी समजू शकेल.' या संवेदनशील काळात तुम्ही आम्हाला समजून घेत आहात आणि मदत करत आहात याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. करीना कपूर खान.
15 जानेवारी रोजी रात्री उशिरा, एक माणूस सैफ अली खानच्या घरात घुसला ज्याचा हेतू चोरीचा होता असे म्हटले जात होते. त्याने सैफवर हल्ला केला आणि त्या चाकूने त्याच्यावर 6 वेळा हल्ला केला. सैफला रात्री लीलावती रुग्णालयात नेण्यात आले आणि 16 जानेवारी रोजी सकाळी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. वृत्तानुसार, सैफच्या मणक्यातही चाकूने वार करण्यात आला होता. सैफ आणि करीनाच्या टीमकडून एक निवेदन आले आहे की सैफ आता धोक्याबाहेर आहे आणि त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्या पाहिजेत.