मुंबई : भाजपाला शिवसेनेसोबत युती हवी आहे, मात्र युती एकतर्फी होऊ शकत नाही. त्यामुळे याबाबत निर्णय शिवसेनेनं घ्यायचा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी युतीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टोलवला. विधान परिषद निवडणुकीत चर्चा करून ३-३ जागा वाटून घेतल्या असल्याचा गौप्यस्फोटही मुख्यमंत्र्यांनी केलाय.
ईव्हीएममध्ये झालेल्या घोळाचा सर्वाधिक फटका भाजपाला बसल्याचा दावाही फडणवीसांनी केलाय. मतदान यंत्र बिघडल्यामुळे भाजपानंच मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.