Airtel चा नवा दमदार रिचार्ज प्लान, मिळणार 140 GB डेटा

एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक जबरदस्त रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे. 449 रुपयांच्या या प्लानच्या माध्यमातुन एअरटेल आपल्या प्रतिस्पर्धी रिलायन्स जिओच्या 448 रुपयांच्या प्लानला टक्कर देणार आहे. पाहूयात एअरटेलने लॉन्च केलेल्या 449 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना काय सुविधा मिळणार आहेत.

Updated: May 31, 2018, 02:57 PM IST
Airtel चा नवा दमदार रिचार्ज प्लान, मिळणार 140 GB डेटा title=
Image source: Reuters

मुंबई : एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक जबरदस्त रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे. 449 रुपयांच्या या प्लानच्या माध्यमातुन एअरटेल आपल्या प्रतिस्पर्धी रिलायन्स जिओच्या 448 रुपयांच्या प्लानला टक्कर देणार आहे. पाहूयात एअरटेलने लॉन्च केलेल्या 449 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना काय सुविधा मिळणार आहेत.

एअरटेलच्या 449 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना प्रति दिन  2GB इंटरनेट डेटा मिळणार आहे. तसेच या प्लानची वैधता 70 दिवसांची असणार आहे. तर, रिलायन्स जिओच्या 448 रुपयांच्या प्लानची वैधता 84 दिवसांची असून प्रति दिन 2GB डेटा ग्राहकांना मिळतो.

अशा प्रकारे एअरटेलच्या 449 रुपायांचा प्लान घेणाऱ्या ग्राहकांना एकूण 140 GB 3G/4G डेटा मिळणार आहे. या प्लानची सविस्तर माहिती एअरटेलच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड लोकल-एसटीडी आणि रोमिंग कॉल्सची सुविधा उपलब्ध आहे. यासोबतच ग्राहकांना 100 SMS ही मिळणार आहेत.

खास बाब अशी आहे की, एअरटेलचं आणखीन एक 448 रुपयांचं रिचार्ज प्लान आहे. या प्लानमध्ये युजर्सला 82 दिवसांची वैधता मिळत आहे आणि त्यासोबत 1.4 GB इंटरनेट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, फ्री एसएमएस सुविधा मिळत आहे.