15000 रुपयांच्या आत बजेट असलेले बेस्ट सेल्फी स्मार्टफोन

भारतीय बाजारात स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे 15,000 रुपयांपर्यंत किंमत असलेले फोन मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. एक नजर टाकूयात 5 स्मार्टफोन्सवर ज्यांची किंमत 15000 रुपयांपेक्षा कमी आहे.

Updated: May 31, 2018, 11:45 AM IST
15000 रुपयांच्या आत बजेट असलेले बेस्ट सेल्फी स्मार्टफोन title=
File Photo

मुंबई : भारतीय बाजारात स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे 15,000 रुपयांपर्यंत किंमत असलेले फोन मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. यापैकी अनेक फोन हे नव्या हार्डवेअर आणि फिचर्ससोबत लॉन्च होत आहेत. ज्यामध्ये फिंगरप्रिंट सेंसर, यूनिबॉडी डिझाईन, मेटल बिल्ड तसेच चांगली कॅमेरा कॉलिटी देण्यात येत आहे. चला तर मग एक नजर टाकूयात 5 स्मार्टफोन्सवर ज्यांची किंमत 15000 रुपयांपेक्षा कमी आहे.

Xiaomi Redmi Note 5 Pro (4GB)

शाओमी Xiaomi Redmi Note 5 Pro हा फोन आमच्या यादीत सर्वातआधी येतो. शाओमीने Note 5 Pro हा स्मार्टफोन नुकताच लॉन्च केला. या फोनमध्ये 20 MP फ्रँट फेसिंग कॅमेरा LED फ्लॅशसोबत देण्यात आला आहे. यासोबतच या फोनमध्ये इतरही अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये फेस अनलॉक आणि ड्युअल रियर कॅमेरा सारखे फिचर्स आहेत. स्नॅपड्रॅगन 636 SoC, 4000 mAh बॅटरी, 4GB रॅम आणि 64 GB स्टोरेजसह येणाऱ्या या फोनची किंमत 14,999 रुपये आहे.

Huawei Honor 9 Lite (4GB)

आमच्या लिस्टमध्ये Huawei कंपनीचा Honor 9 Lite या फोनने जागा मिळवली आहे. हा फोन तुम्हाला केवळ 10,999 रुपयांत उपलब्ध असून यात बेस्ट सेल्फी कॅमेराही उपलब्ध आहे. या फोनमध्ये 13MP + 2MP मेगापिक्सल रियर ड्यूल कॅमेरा आणि 13MP + 2MP मेगापिक्सल फ्रँट सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये फेस अनलॉक हे फिचरही उपलब्ध आहे. 659 SoC, 3000mAh बॅटरी, 3GB रॅम आणि 32 GB स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 10,999 रुपये आहे.

Xiaomi Mi A1

15,000 रुपयांच्या प्राईस कॅटेगरीत अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. Redmi 4 नंतर सर्वाधिक मागणी असलेल्या स्मार्टफोन्समध्ये Mi A1 चा क्रमांक लागतो. त्यामुळेच आमच्या लिस्टमध्ये Xiaomi Mi A1 हा फोन तिसऱ्या क्रमांकावर आहे. या फोनमध्ये 12+12 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे आणि 5 मेगापिक्सलचा फ्रँट फेसिंग सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 5 मेगापिक्सल ऐकायला भलेही तुम्हाला कमी वाटत असेल. मात्र, Mi A1 एक कॅमेरा फोकस्ड फोन आहे आणि हा जवळपास सर्वच कॅमेरा फिचर्ससह उपलब्ध आहे. या फोनची किंमत 13,999 रुपये आहे.

Asus ZenFone Max Pro (M1) (6GB)

Asus ZenFone Max Pro (M1) हा स्मार्टफोन 3 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 3 GB रॅम, 4GB रॅम आणि 6 GB रॅमचा समावेश आहे. 3 GB आणि 4GB रॅमच्या व्हेरिएंटमध्ये 8 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनच्या 6 GB रॅम व्हेरिएंटमध्ये 16 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. तिन्ही व्हेरिएंटमध्ये 13+5 MP ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. 10,999 रुपयांपासून सुरुवात होणाऱ्या या फोनमध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 636 Soc आणि 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. 6GB व्हेरिएंटसाठी तुम्हाला आणखीन काही काळ वाट पहावी लागणार आहे.

Realme 1

आमच्या लिस्टमध्ये पाचव्या आणि शेवटच्या स्थानावर असलेला Realme 1 हा फोन नुकताच लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये जवळपास सर्वच हार्डवेअर आणि फिचर्स मिळणार आहे. 13 MP बॅक कॅमेरा आणि 8 MP फ्रँट फेसिंग कॅमेरा, 6GB रॅम सह येणाऱ्या या फोनची किंमत 13,999 रुपये आहे.